व्हीएस न्यूज - हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाचा इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून खाली जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंजवडीतील फेज 1 मध्ये घडली. महेंद्रसिंग आनसिंग बोरे (वय-19, रा. ब्ल्यू रिच सोसायटी, हिंजवडी, मुळ. उत्तराखंड) असे मृत युवकाचे नाव आहे. तो हिंजवडीतील ब्लु रिच या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. हिंजवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग हा चार दिवसांपूर्वीच ब्लु रिच हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. तो गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्याला चक्कर येत होती. दुपारी चारच्या सुमारास तो इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून गेला. तेथून त्याचा खाली असलेल्या जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या इसामाला हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल घेण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीन आरोपीला पिंपरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गांधीनगर येथील मंहिद्रा ऍन्थीया सोसायटीसमोर घडली. समिल शेख (वय-25, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय़ अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. फौजदार घुगे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड चोरून पळून जाणारा चोरट्याला पिंपरी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता पिंपरीतील गोकुळ हॉटेलसमोर घडली. तुळाराम रंगराव जाधव (वय-18, रा. भेंदीदांडा, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोकुळ हॉटेलसमोरून पिंपरी रेल्वे स्टेशनकडे जात होती. आरोपीने त्याच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड जबरदस्तीने हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. फौजदार निमगीरे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - दिल्लीतील एनसीआर कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरूणाला वेळोवेळी बॅंक खात्यावर तीन लाख रूपये भरण्यास सांगून नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच वाकड येथे उघडकीस आला आहे. अजय मिश्रा (वय-30, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदिप श्रीवास्तव जॉन्सन, जवाहर तिवारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मिश्रा नोकरीच्या शोधात होते. त्यांना आरोपी जॉन्सन व तिवारी यांनी संपर्क साधला. दिल्लीतील एनसीआर कंपनीत उच्च पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने मिश्रा यांना विविध बॅंक खात्यात वेळोवेळी तीन लाख 12 हजार 459 रूपये भरण्यास सांगितले. परंतू, मिश्रा यांना नोकरी लावली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला मोटारीने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ वाजता पाषाण येथील सुतारवाडी येथे घडली. याप्रकरणी मोटार चालकाला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. मोतीलाल खेदरू राय (वय-50, रा. रणपिसे शाळेसमोर सुतारवाडी, पाषाण) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांचा पुतण्या कृष्णा राय (वय-22) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटार चालक दिपेन शांतीलाल शेठीया (वय-38, रा. 703 नम्रता बिल्डींग, घाटकोपर, मुंबई) याला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीलाल राय गुरूवारी सकाळी नऊ वाजता सुतारवाडी येथे मुंबई-बेंगलोर महामार्ग ओलांडत होते. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या राय याचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटार चालक दिपेन शेठीयाला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - वातावरणातील प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून प्रदुषणावर उपाय म्हणून नागरिकांनी इंधनावरील वाहनांचा वापर कमी करुन सायकलाचा जास्तीत-जास्त वापर करावा यासाठी येत्या रविवारी (दि.४)‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो सायकलस्वार सहभागी होऊन औद्योगिकनगरीत सायकल चालवा हा संदेश देणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत यांनी दिली.
सायकलिंगसाठी ५, १५ आणि ३० किलोमीटर असे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या उपक्रमाची रविवारी सकाळी सात वाजता निगडी, प्राधिकरणातील सेक्टर २७ येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ‘झेंडा’ दाखवून सायकलिंगच्या जनजागृतीला सुरुवात होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे उपस्थित असणार आहेत.
”जवळचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. तसेच सायकलिंग केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. चांगल्या वातावरणासाठी, सदृढ आरोग्यासाठी आणि निखळ आनंदासाठी सायकल चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही शहरवासियांना सायकल चालविण्याचे ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत”, असे बिमल रावत यांनी सांगितले.
३० किलोमीटरसाठी निगडी भेळ चौक-बिग इंडिया चौक-हुतात्मा चौक, भोंडवे कॉर्नर-रावेत पूल, डांगे चौक- जगताप डेअरी चौक, कोकणे चौक, नाशिक फाटा पूल-भोसरी लांडेवाडी चौक,केएसबी चौक-थरमॅक्स चौक-यमुनानगर, भक्ती-शक्ती चौक-भेळ चौक असा असणार आहे. १५ किलोमीटरसाठी याच मार्गे डांगे चौकमधून चिंचवडगाव मार्गे आकुर्डी ते प्राधिकण असा असणार आहेत. तर, ५ किलोमीटरसाठी प्राधिकरणातील मार्ग निश्चित केला आहे.
कार्यक्रमाची सांगता निगडी येथे होणार आहे. समारोपावेळी पिंपरी चिंचवड शहरातील पहिले पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत राजाराम पेटकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड व पुणे शहरामधील सायकलिंग, पर्यावरण, गिर्यारोहण, समाजकार्य या क्षेत्रामधील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या उपक्रमानिमित्त मिळणा-या निधीचा वापर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील खरपुड व खोपेवाडी या दुर्गम भागातील दोन छोट्या गावांमध्ये आंनदी ग्राम या नावाने सुरु असणा-या विकास कामांसाठी करणार आहेत. आजपर्यंत रोटरीने या गावांमध्ये जलसंधारण, किफायतशीरदार शेती, फायदेशीर पशुपालन, आरोग्य शिक्षण, शिक्षण या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले आहे.
या उपक्रमाच्या संयोजनात रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष बिमल रावत, आनंदी ग्राम प्रकल्प प्रमुख धनंजय भिंगे, नितीन ढमाले, ‘रोटरी सायक्लोथॉन’ या उपक्रमाचे प्रमुख विजयकुमार नाईक, संदीप डांगे, सदानंद नायक, अतुल भोंडवे, संतोष गिरंजे, मेहुल परमार तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी आमच्यावर टिका करू नये. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. ‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’ असल्याची घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबा त्रिभुवन उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले‘अँनाकोंडा’ असून कचर्यातले पैसे गिळून टाकत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तसेच करदात्यांच्या पैशांची लूट कदापि सहन केली जाणार नाही. या निविदेमुळे महापालिका भिकारी बनणार आहे. त्यामुळे त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली होती. त्याला आज सभागृह नेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ पवार म्हणाले, कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. बीव्हीजी ही संस्था राष्ट्रवादीची पिलावळ आहे. बीव्हीजीला राष्ट्रवादीने महापालिकेला आंदण दिले आहे. महापालिकेच्या सर्वंच विभागातील कामे बीव्हीजीला दिली आहेत. या कामाबाबत महापालिका आयुक्त सविस्तर खुलासा करतील. राष्ट्रवादीने भाजपची बदनामी थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जातील, असा इशाराच सभागृह नेते पवार यांनी दिला.
व्हीएस न्यूज - दिवंगत लोकनेते गोपनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर लोकनेते गोपीनाथ मुंडे जंयती समितीतर्फे येत्या शनिवारी (दि.३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे.
रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी चार वाजता होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. यावेळी महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, भाजपच्या सचिव उमा खापरे, संघटन मंत्री सुनील कर्जतकर, रवी अनासपुरे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पीएमआरडीएचे अध्यक्ष किरणकुमार गीते, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलाजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदी उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी चार वाजता ‘आठवणीतील मुंडे साहेब’ या विषयावर शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता यावी, अशी गोपीनाथ मुंडे यांची इच्छा होती. महापालिका आणि नगरपरिषदेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली. पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरीचे नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजंयती उमरगेकर, पायलट रमीला लटपटे यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती पिंपरी चिंचवड समितीचे शहर जिल्हा निमंत्रक व भाजपच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य सदाशिव खाडे, उद्योजक आबाशेठ नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक नागरगोजे,भगवान सेना पिंपरी-चिंचवड, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठण पुणे, मराठवाडा मित्र मंडळ, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्टाण पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंच पिंपरी चिंचवड, बीड जिल्हा मित्र मंडळ, मराठवाडा जन विकास संघ पिंपरी चिंचवड, भगवान बाबा मित्र मंडळ, जय भगवान महासंघ यांनी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड परिसराती मुंडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9923103459 अथवा 8888880007 यांच्याशी संपर्क साधावा.
व्हीएस न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची कन्या असून पुण्यातील आयएलएस कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून तोंडी आणि लेखी परीक्षेचा यात समावेश असतो. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे श्रुतीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. एप्रिल २०१८ पासून तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. तिचे शालेय शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून झाले आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १०७ व्या तुकडीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. चेन्नईत नॉन टेक्निकल कोर्ससाठी श्रुतीची निवड झाली. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. प्राधिकरण, ग्रीन झोन, रेड झोन व नदी काठचा 100 मीटरचा भाग सोडून महापालिकेने अर्धा, एक गुंठ्यात बांधकाम करण्याची जलद परवानगी द्यावी. त्यानंतरच शहरासह इतर ठिकाणी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. परंतू, शहरात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. यातूनच पिंपळे-गुरव मध्ये काही दिवसांपुर्वी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विरोध करत महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. ही शहरासाठी दुर्देवी घटना आहे. परंतू, सरकारही अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी शुल्क भरा मोकळे व्हा, या नितीमुळे अनधिकृत बांधकामांना एक प्रकारे उत्तेजन असल्याचा आरोप बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच अनधिकृत बांधकामांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचेही दिसून येते. त्यामुळेच शहरात अनधिकृत बांधकामे, झोपडपट्यांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप बकाल यांनी केला आहे....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002