व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या इसामाला हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल घेण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीन आरोपीला पिंपरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गांधीनगर येथील मंहिद्रा ऍन्थीया सोसायटीसमोर घडली. समिल शेख (वय-25, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय़ अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. फौजदार घुगे अधिक तपास करत आहेत.