नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाची तीन लाखांची फसवणूक
वाकड
2018-02-02
व्हीएस न्यूज - दिल्लीतील एनसीआर कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरूणाला वेळोवेळी बॅंक खात्यावर तीन लाख रूपये भरण्यास सांगून नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच वाकड येथे उघडकीस आला आहे. अजय मिश्रा (वय-30, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदिप श्रीवास्तव जॉन्सन, जवाहर तिवारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मिश्रा नोकरीच्या शोधात होते. त्यांना आरोपी जॉन्सन व तिवारी यांनी संपर्क साधला. दिल्लीतील एनसीआर कंपनीत उच्च पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने मिश्रा यांना विविध बॅंक खात्यात वेळोवेळी तीन लाख 12 हजार 459 रूपये भरण्यास सांगितले. परंतू, मिश्रा यांना नोकरी लावली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे अधिक तपास करत आहेत.