व्हीएस न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला मोटारीने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी नऊ वाजता पाषाण येथील सुतारवाडी येथे घडली. याप्रकरणी मोटार चालकाला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे.
मोतीलाल खेदरू राय (वय-50, रा. रणपिसे शाळेसमोर सुतारवाडी, पाषाण) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. त्यांचा पुतण्या कृष्णा राय (वय-22) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटार चालक दिपेन शांतीलाल शेठीया (वय-38, रा. 703 नम्रता बिल्डींग, घाटकोपर, मुंबई) याला पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीलाल राय गुरूवारी सकाळी नऊ वाजता सुतारवाडी येथे मुंबई-बेंगलोर महामार्ग ओलांडत होते. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या राय याचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटार चालक दिपेन शेठीयाला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002