व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड चोरून पळून जाणारा चोरट्याला पिंपरी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता पिंपरीतील गोकुळ हॉटेलसमोर घडली. तुळाराम रंगराव जाधव (वय-18, रा. भेंदीदांडा, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोकुळ हॉटेलसमोरून पिंपरी रेल्वे स्टेशनकडे जात होती. आरोपीने त्याच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीचा मोबाईल व आधार कार्ड जबरदस्तीने हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. फौजदार निमगीरे अधिक तपास करत आहेत.