व्हीएस न्यूज - हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एका 19 वर्षीय युवकाचा इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून खाली जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंजवडीतील फेज 1 मध्ये घडली. महेंद्रसिंग आनसिंग बोरे (वय-19, रा. ब्ल्यू रिच सोसायटी, हिंजवडी, मुळ. उत्तराखंड) असे मृत युवकाचे नाव आहे. तो हिंजवडीतील ब्लु रिच या हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. हिंजवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग हा चार दिवसांपूर्वीच ब्लु रिच हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. तो गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्याला चक्कर येत होती. दुपारी चारच्या सुमारास तो इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून गेला. तेथून त्याचा खाली असलेल्या जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.