व्हीएस न्यूज - बाबुरावजी घोलप यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी घोलप महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मेळाव्यात भाग घेतला. या मेळाव्यास राहुल जवळकर आणि माजी नगरसेविका वैशाली जवळकर, राम जांभूलकर, महविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित शिर्के, प्रसाद जाधव, अपर्णा भालेराव यांच्यासह माजी विद्यार्थी हजार होते. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा प्रकाश पांगारे यांनी तर आभार प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय घारे व प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी योगदान दिले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, डॉ.एल. के. निकम उपस्थित होते.