व्हीएस न्यूज - ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर, प्रशांत पाटील, परशु केकाण, पूजा ठवरे, यशस्वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, अंकुश पांढरे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह शालेय वैयक्तिक व सामाहिक स्पर्धा, खेळ, मनोरंजनात्मत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी पल्लवी जाधव, हेमांगी शिंदे, शीतल जगताप, पूजा ठवरे, हेमलता राऊत, रुपाली गजरमल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती बोन्द्रे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी तर आभार अनिल नाटेकर यांनी मानले.