निगडीतील अमृता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तैलबैला सर केला
निगडी
2018-02-02
व्हीएस न्यूज - निगडीतील अमृता विद्यालयाच्या 9 विद्यार्थिनींनी सह्याद्री पर्वतरांगेतील 1013 मीटर उंचीचा तैलबैला हा अवघड कातळकडा प्रस्तरारोहण करून नुकताच सर केला. विद्यालयात इयत्ता 6 वी ते 9 वी मधील चेलुवी ढोकले, वैदेही भोंगे, श्रेया भदे, मानसी मगर, मृणाल ठाकर, आकांक्षा पवार, सई भालघरे, वैष्णवी गवळी, तनिष्का पवार या विद्यार्थिनींनी हे साहस केले. या सर्व 12 ते 15 वयोगटातील आहेत. गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.