व्हीएस न्यूज - अँम्युनिशन फॅंक्टरीतील अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेला. ही घटना खडकीतील अर्जुन मार्ग येथे सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत घडली.
विश्वजीत मित्रा (वय-39, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्रा हे अँम्युनिशन फॅंक्टरी येथे अधिकारी म्हणुन सेवेत आहेत. अर्जुन मार्ग येथिल बंगल्यात ते कुटुंबिया समवेत वास्ताव्यास आहे. गावावरुण त्यांचे काही नातेवाईक दोन दिवसापुर्वी आले होते. मित्रा या नातेवाईकांना कुटुंबियासमवेत मंगळवारी सकाळी शिर्डीला देवदर्शना साठी घेऊन गेले होते. रात्री ते परत आले. बंगल्यातील बेडरुमचे कपाटेचे टाळे तुटलेले व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता असे दिसुन आले की बंगल्याच्या कंपाउडवरुण उडी मारुन चोरट्यांनी घराचे मागील दाराचे कुलूप तोडले. आतील कडी कोयंडा तोडुन बेडरुममध्ये प्रवेश केला व बेडरुम मधील दोन लाकडी कपाटाचे ताळे तोडुन त्यातील 26 तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख 25 हजार रुपये असा 6 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी येथिल सर्व्हंट क्वार्टर मधील तीन महिला व दोन पुरुष असे पाच कामगारांना संशयित म्हणुन चौकशी करिता ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीतील फुटेज ही पोलिसांना मिळाले असुन पोलिस त्या आधारे आपला पुढिल तपास करीत आहेत. फौजदार एस. बी. भोसले अधिक तपास करत आहेत.