व्हीएस न्यूज - कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार सीओडी कामगाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये घडली. सुनिल नारायण जाधव (वय-47, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, वारजे, माळवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनस डेपोमध्ये कामाला होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.