व्हीएस न्यूज - बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेला. ही घटना खडकीतील अर्जुन मार्ग येथे सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत घडली. विश्वजीत मित्रा (वय-39, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रा यांचा खडकीतील अर्जुन मार्ग येथे बंगला आहे. मंगळवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. याकालावधीत चोरट्याने बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारली. घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाख 1 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार एस. बी. भोसले अधिक तपास करत आहेत.