व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीसाठी आज (गुरुवार) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विद्युत विभागातील रावेत पंपीग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.