व्हीएस न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ व डॉ.डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ.डी.वाय.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने घाटघर कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्यात वनस्पती शास्त्राच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्मिळ औषधी वनस्पती अभ्यास करणे, त्यांचा अभ्यास करून तेथील आदिवासी बांधवांना त्याची जपवणुक कशी करावी याची माहिती देणे तसेच निसर्ग आणि जैवविविधता यांचा अभ्यास करणे हा हेतु होता. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन प्रवरा इंन्स्ट्यूटचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज, स्वामी रांमानंदतीर्थ मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विदयासागर उपस्थित होते. या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठातील वनस्पतीषास्त्रातील तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सचिन पुणेकर, डॉ. मिलींद सरदेसाई, डॉ.डी.आर शिर्के, डॉ.महेश शिंदीकर यासारख्या वनस्पतीषास्त्रात अभ्यासक असणाऱ्या व्यक्ती होत्या.
या परिषदेमध्ये सहभागी व्यक्तींना नाईट टक करणे, निसर्गाची पाहणी करणे, आपला इतिहास अभ्यासणे या गोष्टींचा अनुभव घेता आला. या परिषदेच्या आयोजनामध्ये महाविदयालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख प्रा. अर्चना सुतार, ए. आर.सी.अंजली अकीवाटे, प्रा.हेमल ढगे,प्रा.मुकेष तिवारी यांचा समावेष होता. प्रास्ताविक प्रा. अंजली अकीवाटे यांनी केले. आभार प्रा.अर्चना सुतार यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002