व्हीएस न्यूज - आजाराने ग्रस्त व बेरोजगार असल्याने यातून आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घऱी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना खराळवाडीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.
नारायण रामचंद्र ढमाले (वय-48, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण ढमाले गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. त्यातच त्यांना आजाराने ग्रासल्याने याच नैराश्यातून बुधवारी घरात कोणी नसताना नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.