वाहनतळातील तीन दुचाकी, एक सायकल झाळली, 88 हजारांचे नुकसान
निगडी
2018-02-07
व्हीएस न्यूज - वाहनतळात पार्क केलेल्या तीन दुचाकी व एक सायकलला अज्ञाताने आग लावली. यामध्ये 88 हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री चिंचवड येथील अजंठानगरातील टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळ येथे घडली. सुमन गायकवाड (40, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड, लता मोहन खरचणे यांची ड्रिम युगा, एक ऍटलस कंपनीची रेंजर सायकल तर भाऊसाहेब सुर्यभान ठोसर यांची हिरो होंडाची दुचाकी अशा तीन दुचाकीला व एका सायकल टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळात लावली होती. अज्ञात आरोपीने आग लावून 88 हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एस. एस. सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.