Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
माजी नगरसेवक ननावरे, मोटे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश 

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपाचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे व राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे किरण मोटे यांनी बुधवारी मुंबईत मातोश्री बंगल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थितीत होते.
जितेंद्र ननवरे हे 10 वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. 2017च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी संत तुकारामनगर-कासारवाडी या प्रभागातुन मिळाली होती. तसेच किरण मोटे हे कासारवाडी प्रभागातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक म्हणुन 2012 च्या निवडणुकीत निवडूण आले होते.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने खासगी कंपनीची जाहिरात करणे दुर्दैवाची बाब

व्हीएस न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी टॅलेंटेड आर्टिस्ट असून मोकळा श्वास घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा. पण अशा खासगी कंपनीची जाहिरात मुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीने करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर नदीवरील टी सिरीजच्या जाहिरातीवरून टीका केली. या जाहिरातीत मुंबई पोलीस आयुक्तांचे काय काम आहे?असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर सुळे यांनी सरकारवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुनही टीका केली. मराठी भाषेचा राग राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला आहे की काय? अशीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे. मराठी भाषेचा अधिवेशनात सातत्याने अपमान होणाऱ्या घटना घडल्या आहेत. १३०० मराठी शाळा बंद करण्याच पाप हे सरकार करत आहे. त्यामुळे भाजप आणि सेना दोघांकडून मराठीचा अपमान केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी पुण्यातील एम्प्रेस गार्डनच्या जमिनीच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांना सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्याशी बोलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

...Read More

V. S. News
सोसायटीच्या दोन सभासदांना बिल्डरच्या टोळीकडून मारहाण 

व्हीएस न्यूज - सोसायटीतील सभासद आणि बिल्डर यांच्यात आयोजित बैठकीत झालेल्या वादावरून बिल्डरच्या 27 जणांच्या टोळीकडून दोन सभासदांना बॅटने व हाताने जबर मारहाण करून धमकी दिली. ही घटना मुळशी, माणगाव येथील शर्मा व्हिलेज अपार्टमेंट रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी तिन आरोपींना हिंजवडी पोलीसांनी अटक केली असून त्याचे साथीदार फरार आहेत.
संतोष शिवाजी इरले (वय-35, रा. माणगाव,ता. मुळशी), विशाल सुरेशराव बलकवडे (वय-35, रा. जनवाडी), रविंद्र मोतीलाल जव्हेरी (वय-51, रा. आरोयन कॉम्प्लेक्स, खडकी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रॉबर्ट ऍन्थोनी पॉल (वय-30, रा. शर्मा व्हिलेज अपार्टमेंट, माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा व्हिलेज अपार्टमेंटच्या सभासदांची बिल्डर शर्माबरोबर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होती. यावेळी बिल्डर व सभासदांमध्ये काही कारणावरून वादावादी झाली. याचा राग आल्याने बिल्डर शर्माच्या 27 जणांच्या टोळीने फिर्यादी पॉल व सोसायटीच्या आणखी एका सभासदाला बॅटने व हाताने जबर मारहाण करत धमकी दिली.
फौजदार नंदराज गभाले अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
एटीएममधील बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड

व्हीएस न्यूज - पिंपळे गुरव व सांगवी परिसरातील एटीएम सेंटर मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यास सांगवी पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख 72 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुरज हरिश्चंद्र मेश्राम (वय 30, रा. लांडे बिल्डिंग, कासारवाडी पुणे), शौकत मकबूल शेख (वय 38, गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव, पुणे), सतीश वानखेडे (वय 32, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव, पुणे) आणि राजेश उर्फ सरदार उर्फ दाजी शिवराम तायडे (वय 35, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवरील असलेल्या सांगवी पोलीसांना माडर्न व्ही आर सेक्युरिटी फोर्स प्रा. ली. च्या पथकाने बॅटरी चोरी करण्यासाठी चोरांकडून वापरल्या जात असलेल्या वाहनाची माहिती दिली. पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा रचून वाहन पकडले. वाहनासोबत सुरज मेश्राम व शौकत शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सांगवी पोलिसांनी सतीश वानखेडे व राजेश तायडे या आरोपींना ताब्यात घेवून चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून एक लाख, 92 हजार रुपये किमतीच्या 30 बॅटऱ्या, एक पॅगो वाहन (एम एच 14, एझेड 3821) किंमत सुमारे एक लाख, 50 हजार, एक पॅशन प्रो मोटारसायकल (एम एच 14, जीजे 9568) किंमत अंदाजे 30 हजार रुपये असा एकूण तीन लाख 72 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस हवालदार सुरेश खांडेकर आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
अज्ञात मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू 

व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला अज्ञात मोटारीने धडक दिल्याने महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी कासारवाडी, नाशिक फाटा येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
मंदा सिताराम चासकर (वय-60, रा. म्हाळुंगे, पडवळ, आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्याचा भाऊ माधव चासकर (वय-50, रा. चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, मंदा चासकर या 22 फेब्रुवारी रोजी नाशिक फाटा येथील मराठा खानावळ येथून पायी जात होत्या. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारीने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊऩ चासकर यांचा मृत्यू झाला.
फौजदार एन. ए. डावरे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
घरफोडी, वाहनचोरी करणारे चार जण जेरबंद 

21 गुन्हे उघड :23 लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हीएस न्यूज -
घरफोडी आणि वाहनचोरी करणाया चार जणांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल गुन्हे उघडकीस आले असून 23 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
राजू शंभू देवनाथ (वय 19, रा. कृष्णानगर, हडपसर), मंगेश विजय चव्हाण (वय 22, रा. गोखलेनगर), मजहर नॅजो जमादार (वय 30, शिवाजीनगर), अल्ताफ उर्फ बचक्या पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजू देवनाथ, मंगेश चव्हाण व अल्पवयीन मुलगा असे तिघे मजहर याच्या रिक्षातून चोरी करण्यासाठी जात. तर बचक्या पठाण यांच्यामार्फत चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावत. चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, तीन रिक्षा, सहा दुचाकी, सहा डिजीटल वॅैमेरे, सात घड्याळे, सात मोबाईल, एक लॅनटॉप, एक एलईडी टीव्ही असा 23 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चिंचवड 6, सिंहगड
2, पिंपरी 1, तळेगाव 1, चतु:शृंगी 2, खडकी 2, एमआयडीसी 2, भोसरी 2, सांगवी 1, बंडगार्डन 1 असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये वाहनचोरीचे 4, घरफोडीचे 14 व इतर 3 या गुन्ह्यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तुल, सहा जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
चालकाला चक्कर आल्याने पीएमपीएमएल बस उलटली

व्हीएस न्यूज - पीएमपीएमएल बस चालकाला बस चालवत असताना अचानक भोवळ आली. बस बाजूला घेत असताना नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयासमोर घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी - किवळे (एमएच 12, सीएच 3946) ही बस निगडीवरून देहूरोडच्या दिशेने जात होती. देहूरोड जवळील केंद्रीय विद्यालयासमोर आल्यानंतर बस चालकाला अचानक भोवळ आली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटून बसचे एक चाक रस्त्याखाली खड्‌ड्यात उतरले. यामुळे बस पलटी झाली. बसमध्ये प्रवासी होते. त्यातील 7-8 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर, चालक गंभीर जखमी झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

...Read More

V. S. News
अत्रे सभागृहाच्या  सज्जावरून पडून मजुराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करत असताना 65 वर्षीय वृद्ध मजुराचा सज्जावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
कचरू लिंबाजी डोंगरे (वय-65) असे सज्जावरून पडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. डोंगरे हे याठिकाणी मजुर म्हणून काम करत होते. दुपारी नेहमीप्रमाणे सज्जावर उभे राहून सभागृहाला प्लास्टर करण्याचे काम करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने डोंगरे यांना त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
आत्महत्या केलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

व्हीएस न्यूज - पवना नदीत उडी मारून शनिवारी आत्महत्या केलेल्या केलेल्या तरूणाचा मृतदेह रविवारी सकाळी अग्निशामक दलाने शोधून काढला.
अक्षय गेरबा ढोणे (वय 26, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अक्षय याने सांगवीतील मैलाशुध्दीकरण प्रकल्पाजवळ नदीपात्रात उडी मारली. परिसरातील नागरिकांनी त्वरीत महापालिका अग्निशामक दलाला खबर दिली. अग्निशामक जवानांनी त्याचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो मिळून आला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

...Read More

V. S. News
पोलीस असल्याच्या बतावणीने  दोन वृद्धांचे दागिने लांबवले

व्हीएस न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोतया पोलिसांनी पळवल्याची घटना काही वेळापूर्वी घडली.
याप्रकरणी कुलकर्णी (वय 68) आणि मेघना डबळी (वय 69) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी आणि मेघना डबळी वीर आर्केड बीआरटी रोड येथून जात असताना मोटारसायकलवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी 'आम्ही पोलीस आहोत तुमच्या गळ्यातील सोने चोरीला जाऊ शकते तुम्ही तातडीने तुमच्या गळ्यातील दागिने तुमच्या पर्समध्ये टाका'. असे बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स ऐवजी त्यांच्या जवळील बॅगेत टाकून फरार झाले. हे लक्षात येताच दोघींनी पोलिसांशी संपर्क साधला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी एक जण उंच असून 30 ते 35 वर्षाचा आहे. त्याने काळी पॅंट आणि तपकिरी रंगाचा शर्ट घातला आहे. तर दुसरा एक जण धिप्पाड सावळा असून त्याने काळा आणि तपकिरी रंगाचा मिक्स काळा टी शर्ट काळी पॅन्ट आणि काळी टोपी घातली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
महिनाभरापुर्वीची शिवनेरी एसटी बस अपघाताची पुनरावृत्ती टळली  

व्हीएस न्यूज - महिनाभरापुर्वी धावत्या शिवनेरी एस.टी.बस चे उघडल्या गेलेल्या डीक्कीमुळे घडलेल्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सोमवारी दुपारी निगडीवरुन मनपा कडे जाणाऱ्या पीएमपीएल बसच्या उघड्या असलेल्या सीएनजी बॉंक्सचे झाकन जागरुक नागरिकाने वेळीच वाहनचालकास निदर्शनास आणुन दिल्यामुळे एसटी बस अपघाताची पुनरावृती टळली.
खडकी येथे वास्तव्यास असलेले डॅंनियल रत्नाकर केदारी (वय50) हे दुपारी 1 वाजता दुचाकीवरुन भवानी पेठ पुणे येथे आईला भेटण्यास निघाले होते. मरीआई पोलिस चौकी समोरील मार्गाने जात असताना निगडीवरुन मनपाकडे निघालेली (एम.एच-12 के.क्यु. 1741) या पीएमपीएल बसच्या उजव्या बाजुस असलेले सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असलेले केदारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ येथिल संजय हुंडई शोरुम जवळ बस थांबवुन वाहनचालकास सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असल्याचे सांगितले. वाहनचालकाने बस डेपोत घेऊन जाऊ व झाकन व्यवस्थितरित्या लावुन घेऊ अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. मात्र केदारी यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य वाहनचालकाच्या निदर्शनास आणुन देत महिनाभरा पूर्वीच शिवनेरी एस.टी.बस अपघाताची घटना लक्षात आणुन दिली. त्यानंतर वाहनचालकाने अखेर सीएनजी बॉंक्सचे उघडलेले झाकन तारेने तात्पुरते बंद केले व डेपोत बस नेऊन झाकन व्यवस्थितरित्या बंद केले जाईल असे केदारी यांना सांगितले. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!