व्हीएस न्यूज - महिनाभरापुर्वी धावत्या शिवनेरी एस.टी.बस चे उघडल्या गेलेल्या डीक्कीमुळे घडलेल्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. सोमवारी दुपारी निगडीवरुन मनपा कडे जाणाऱ्या पीएमपीएल बसच्या उघड्या असलेल्या सीएनजी बॉंक्सचे झाकन जागरुक नागरिकाने वेळीच वाहनचालकास निदर्शनास आणुन दिल्यामुळे एसटी बस अपघाताची पुनरावृती टळली.
खडकी येथे वास्तव्यास असलेले डॅंनियल रत्नाकर केदारी (वय50) हे दुपारी 1 वाजता दुचाकीवरुन भवानी पेठ पुणे येथे आईला भेटण्यास निघाले होते. मरीआई पोलिस चौकी समोरील मार्गाने जात असताना निगडीवरुन मनपाकडे निघालेली (एम.एच-12 के.क्यु. 1741) या पीएमपीएल बसच्या उजव्या बाजुस असलेले सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असलेले केदारी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ येथिल संजय हुंडई शोरुम जवळ बस थांबवुन वाहनचालकास सीएनजी बॉंक्सचे झाकन उघडे असल्याचे सांगितले. वाहनचालकाने बस डेपोत घेऊन जाऊ व झाकन व्यवस्थितरित्या लावुन घेऊ अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. मात्र केदारी यांनी सदर प्रकरणाचे गांभिर्य वाहनचालकाच्या निदर्शनास आणुन देत महिनाभरा पूर्वीच शिवनेरी एस.टी.बस अपघाताची घटना लक्षात आणुन दिली. त्यानंतर वाहनचालकाने अखेर सीएनजी बॉंक्सचे उघडलेले झाकन तारेने तात्पुरते बंद केले व डेपोत बस नेऊन झाकन व्यवस्थितरित्या बंद केले जाईल असे केदारी यांना सांगितले. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002