व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु आहे. डागडुजीचे काम करत असताना 65 वर्षीय वृद्ध मजुराचा सज्जावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
कचरू लिंबाजी डोंगरे (वय-65) असे सज्जावरून पडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजी करण्याचे काम सुरु आहे. डोंगरे हे याठिकाणी मजुर म्हणून काम करत होते. दुपारी नेहमीप्रमाणे सज्जावर उभे राहून सभागृहाला प्लास्टर करण्याचे काम करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्याने डोंगरे यांना त्वरीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.