व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी टॅलेंटेड आर्टिस्ट असून मोकळा श्वास घेण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा. पण अशा खासगी कंपनीची जाहिरात मुख्यमंत्री या पदावर असलेल्या व्यक्तीने करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर नदीवरील टी सिरीजच्या जाहिरातीवरून टीका केली. या जाहिरातीत मुंबई पोलीस आयुक्तांचे काय काम आहे?असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचबरोबर सुळे यांनी सरकारवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुनही टीका केली. मराठी भाषेचा राग राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला आहे की काय? अशीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे. मराठी भाषेचा अधिवेशनात सातत्याने अपमान होणाऱ्या घटना घडल्या आहेत. १३०० मराठी शाळा बंद करण्याच पाप हे सरकार करत आहे. त्यामुळे भाजप आणि सेना दोघांकडून मराठीचा अपमान केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी पुण्यातील एम्प्रेस गार्डनच्या जमिनीच्या प्रश्नावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांना सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्याशी बोलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002