व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला अज्ञात मोटारीने धडक दिल्याने महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी कासारवाडी, नाशिक फाटा येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
मंदा सिताराम चासकर (वय-60, रा. म्हाळुंगे, पडवळ, आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्याचा भाऊ माधव चासकर (वय-50, रा. चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, मंदा चासकर या 22 फेब्रुवारी रोजी नाशिक फाटा येथील मराठा खानावळ येथून पायी जात होत्या. भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारीने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊऩ चासकर यांचा मृत्यू झाला.
फौजदार एन. ए. डावरे अधिक तपास करत आहेत.