व्हीएस न्यूज - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीने अभ्यासाच्या तणावामुळे होस्टेलवर ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दीडच्या सुमारासा चिंचवड येथे उघडकीस आली.
प्रिती गोरख जाधव (वय 22 वर्ष रा. चिंचवड, मूळ सांगवी, जिल्हा बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रिती ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. चिंचवड, गांधी पेठ येथे होस्टलमध्ये ती मैत्रिणीसोबत राहत होती. शुक्रवारी होस्टलमध्ये कोण नसताना तीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास तीची एक मैत्रिण होस्टलमध्ये आली.
तिने दरवाजा ठोठाविला असता आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. घर मालकीनेने घराच्या जाळीतून पाहिले असता प्रिती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी प्रितीने लिहून ठेवली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002