व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्याची एस.एस.सी परीक्षा तळेगाव शहर व मावळ परिसरात शांततेत सुरु झाली. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वच केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पहिला पेपर सोपा गेल्याने आनंद व्यक्त केला.
मावळ तालुक्यात एकूण अकरा केंद्रावर 6560 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तळेगावात रामभाऊ परुळेकर आणि ऍड पु. वा. परांजपे विद्या मंदिर अशी दोन प्रमुख मुख्य केंद्र आहेत. या दोन्ही केंद्रात एकूण 1562 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
मावळ तालुका मुख्याध्यपक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका शिक्षेकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय कसाबी, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष महेश शहा आदि संस्थांचे पदाधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
मावळ तालुक्यात लोणावळा शहरात 1564 विद्यार्थी, पवनानगर 434 विद्यार्थी, वडगाव 743 विद्यार्थी, चांदखेड 424 विद्यार्थी, देहूरोड 823 विद्यार्थी, देहू 359 विद्यार्थी, तसेच तळेगाव दाभाडे येथे 1562 विद्यार्थी असे तालुक्यातील विविध माध्यमिक शाळामधील विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे मावळ तालुका मुख्याध्यपक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002