व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा
महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सदस्य शितल शिंदे, नगरसदस्या झामाबाई बारणे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, चारुशिला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये भांडार अधिकारी सुरेश लांडगे, असिस्टंट मेट्रन शोभा शिंदे, मुख्य आरोग्य निरिक्षक संजय
देसाई, मुख्य लिपिक किशोर केदारी, नितीन खंडागळे, अंकुश लाहीगुडे, दत्तात्रय वाघमारे, फार्मासीस्ट किशोर परदेशी, ग्रंथपाल कम लिपिक आशा शिंदे, मजूर रमाकांत दळवी, आरोग्य कर्मचारी जालिंदर मकासरे, भागीरथी वजाळे यांचा समावेश आहे.
तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी संजय पोटे, मुख्य लिपिक कैलास गायकवाड, हार्टीकल्चर सुपरवायझर इलाई बंडवल, प्रभाकर कुंभार, आरोग्य कर्मचारी सिताबाई तुपे, भारती क्षीरसागर, प्रकाश शिंदे, सुभाष ढोरे, मनोजकुमार ढिलोड, लक्ष्मी भोसले, यांचा समावेश आहे. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002