भांडणे सोडविण्यास आलेल्या दोघांना चोपले
व्हीएस न्यूज - बारा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला हॉकी स्टिक, सिमेंटच्या गट्टूने जबर मारहाण केली. तरूणाला वाचविण्यासाठी आलेल्या दोघांनाही टोळक्याने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास गांधीनगर येथे घडला. पूर्ववैमनस्यातूनच हाणामारीचा प्रकार घडल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
दिनेश शिंगाडे (वय 26, रा. खराळवाडी), अक्षय थोरात, (वय20), कुणाल वेताळ (वय19), अनिकेत भांडेकर (वय20), लंकेश गुंजे (वय21), सुनिल तेलकर (वय19), रामु बनपट्टे (वय20), विजय धोत्रे (वय21), बसलिंग (वय21), योगेश बनपट्टे (वय25) यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चंद्रकांत बोचकुरे (वय-28, रा. पिंपरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फौजदार सागर पाटील यांनी माहिती दिली. शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास हातात कोयते, हॉकी स्टिक, गड्डू घेवून दहशत माजवित फिर्यादीचा मित्र सौरभ वाघमारे याला बारा जणाच्या टोळक्याने जबर मारहाण केली. सौरभच्या मदतीला गेलेल्या फिर्यादी यांना आरोपी दिनेश शिंगाडे याने जीवे मारण्याची धमकी देत डोक्याच्या उजव्या बाजूस सिमेंटचा गट्टू मारून गंभीर जखमी केले. तर राहूल खाटीकमारे याला जबर मारहाण केली. पूर्व वैमनस्यातूनच हाणामारी झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002