व्हीएस न्यूज - जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. एकाहून एक सरस प्रकल्प सादर करीत चिमुकल्यांनी विज्ञानाची गुपिते उलगडली. फायर अलार्म, सबमशीन, विघटनशील प्लास्टिक, स्पीड कंट्रोलर, वॉटर लेव्हल इंडिकेटर, एल.ई. डी. अल्ट्रासॉनिक सेन्सर, गर्ल्स सेफ्टी डिवाइस, हायड्रॉलिक ब्रिज, प्रोजेक्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. पाणी वाचवा संदेश, पर्यावरणाची हानी रोखण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले.
आरती राव म्हणाल्या, विज्ञानाची कास धरुन त्याचे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावे, याकरीता असे प्रकल्प उपयुक्त आहेत. प्रत्येक घटनेमागे शास्त्रीय विवेचन असते. त्यामुळे विज्ञान प्रकल्पांमधून आपल्याला नैसर्गिक गुणधर्मांच्या क्रिया व प्रतिक्रिया समजतात. विज्ञानातील गमतीजमती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सतत नवीन शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्याच्या मनात वेगळा आणि नाविन्यपूर्ण विचार येईल, तो शास्त्रज्ञ बनू शकतो. विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांतील शास्त्रज्ञ वृत्ती विकसित करीत असते. त्यामुळे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विज्ञान शिकण्यापेक्षा आवडीने विज्ञान शिकायला हवे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002