Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
कुंकूमार्चन, लक्ष्मी होमला पिंपरीत  प्रतिसाद

व्हीएस न्यूज - आर्ट ऑफ लिव्हिंग, वेदिका धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त पिंपरीत कुंकूमार्चन व लक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1800 नागरिक उपस्थित होते.

संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडा संकुल मैदानात या होम व कुंकूमार्चनचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, समृध्दीसाठी हे होम व कुंकूमार्चन केले. यावेळी स्वामी प्रविण शर्मा, संतोष व अभय पंडीत यांनी हवन केले. कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्ंिहगचे सचिन नाईक, सौंदर्या मुलगे, अतुल तातर, उमा देशमुख, रूषिकेश जोशी, सुमित जाधव, संगमेश मनट्टी, धनराज सोळुखे, तेजश्री कपोते, प्रतिमा नाईक, नंदिनी सिंग, पुजा गराडे, अपुर्वा मुलगे, दिनानाथ जोशी आदींनी केले.

...Read More

V. S. News
बालकांवर लैंगिक अत्याचार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज

व्हीएस न्यूज - भारतात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अत्याचार सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या ठिकाणी, घरात होतात. शुन्य ते 18वयोगटातील लैंगिक अत्याचारग्रस्त मुले व मुलींसाठी 'चाईल्ड हेल्पलाईन' तर्फे मदत केली जाते. परंतू, मुलांवर किंवा मुलींवर लैंगिक अत्याचार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या चाईल्ड हेल्पलाईनच्या सविता दिवटे यांनी केले.

बोपोडी येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिंनी दिपज्योती यादव हिने बचत गटांच्या महिलांसाठी 'बाल लैंगिक अत्याचार' संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी दिवटे बोलत होत्या. याप्रसंगी चाईल्ड हेल्पलाईनच्या सुमित्रा बनसोड, जयश्री पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागाचे विद्यार्थी अनिकेत कळंबे, वैभव माळी यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

धकाधकीच्या जीवनात पालकांनी आपल्या मुलाशी वेळोवेळी संवाद साधूवा त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. तसेच चाईल्ड हेल्पलाईन कशाप्रकारे काम करते, याची सविस्तर माहिती महिलांना दिवटे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपज्योती यादव हिने तर अनिकेत कळंबे याने आभार मानले.

...Read More

V. S. News
रिलायबल हेल्थ फॉंडेशनकडून मोफत रुग्णवाहिका सेवा

व्हीएस न्यूज - रिलायबल हेल्थ फॉंडेशनकडून आपत्कालीन रुग्णासाठी विनामुल्य रुग्णवाहिकेच्या सेवेचे उद्‌घाटन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

लेक शावर रेसिडेन्सी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले, लोकमान्य रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, पोलीस निरीक्षक अरुण मोरे, संभाजीराव पाटील, डॉ.दिनेश मांजरेकर, डॉ.नम्रता मांजरेकर, दिनेश पाटील, सुधीर आगरवाल, सुनील काळे, आयुषी श्रीखंडे, रुपाली शिनगारे, राहुल खळदे, काशिनाथ येवले, आशिष सूर्यवंशी, श्रीकृष्ण जोशी, सारिका घोलप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, अत्यंत अडचणीच्या प्रसंगी रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक असते. त्यावेळी रिलायबल हेल्थ फॉंडेशनकडून आपत्कालीन रुग्णासाठी विनामुल्य रुग्णवाहिकेच्या सेवेची तरतूद केली जाईल. जगनाडे म्हणाल्या डॉक्टर म्हणचे रुग्णाचा देव असतो. पण त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग या हेल्थ फॉंडेशनने विनामुल्य निर्माण केला आहे. अश्या प्रकारची लोकहिताची कामे संस्थाच्या माध्यमातून केली गेलीतर याचा फायदा निश्चितच सर्वांना होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मांजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन फाकटकर यांनी तर डॉ. आयुषी श्रीखंडे यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
बेकायदेशीर रित्या जमाव जमवून मारहाण करून घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न

व्हीएस न्युज - बेकायदेशीर रित्या जमाव जमवून घरात घुसून घरातील पुरुष ,महिला आणि लहान मुलांना मारहाण करून घराचा ताबा घेण्याची घटना १३ मार्च रोजी लोहगाव येथील कलवड (विकासनगर) वस्ती येथे घडली.

मोहम्मद अली आणि नबीउनीसा इशरात अली यांनी लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्यात मारेकरी शकीलअहमद शेख ,केतन मारणे ,सुरज टिंगरे ,दुबे आणि तिवारी आणि त्यांचा बरोबर असलेल्या दोन महिलांच्या विरोधात फिर्याद दिली .लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी दुबे आणि तीवरी यांच्यावर तक्रार क्र -८०/२०१८ कलम १४३/१४७/१२३/४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी अर्धवट कारवाई केल्या मुळे उर्वरित मारेकरी ज्यांच्यावर गुन्हे दाखल न करता सोडण्यात आले ,त्यांनी १८ मार्च रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान घरात घुसून पुन्हा घराची तोड फोड करत घरातील परिवाराला मारहाण केली , महिलांना धक्का बुक्की करत शिवीगाळ केली. अद्याप या मारेकऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही व त्यांचे पाठराखण करत आहेत अशी तक्रार नबीउनीसा इशरात अली यांनी व्यक्त केली .उर्वरित मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद होणे बाबत चा अर्ज पोलीस आयुक्तांना केला आहे. गेले दोन वर्षा पासून नबीउनीसा यांचे पती घरी परतले नाही व शकील अहमद शेख ,दुबे आणि तिवारी यांच्यावर संशय आहे असे त्या म्हणाल्या.

पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्या कडून प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांना मिळालेल्या महिती नुसार सदरची बाब ही घराच्या व जागेच्या वादातून निर्माण झाली आहे. ते म्हणाले कि सदरचे घर हे कोणाच्या मालकीचे आहे हे न्यायालय ठरवेल. आणि या वादातून काही अनुचित प्रकार घडू नयेत या साठी प्रयत्न करीत आहोत.

https://youtu.be/7UcgmgvZMYI

...Read More

V. S. News
बुलडाणा अर्बन बँक घोटाळ्याविरोधात दलित विद्यार्थी संघटना जन आंदोलन उभारणार

व्हीएस न्यूज - बुलडाणा बँकेच्या भ्रष्ट्राचारविरोधात कोब्रा संघटना प्रमुख नेताजी चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱयांनी एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी राळेगण यादव मंदिरात जाऊन पदाधिकाऱयांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन अर्धा तास बुलडाणा अर्बन घोटाळ्या विषयी चर्चा केली. तसेच बुलडाणा अर्बन बँक घोटाळ्याविरोधात दलित विद्यार्थी संघटनेने जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी नेताजी चव्हाण यांच्याकडील घोटाळ्याची कागदोपत्री पाहणी करून जन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. सहकार आयुक्तांची दिल्ली येथे भेट घेऊन संबंधितांवर कारवाई, तसेच बुलडाणा अर्बनवर प्रशासक नेमणे व सुपर ऑडीटची मागणी करणार असल्याचे जाहीर केले.
या संदर्भात, म.रा.मुख्यमंत्री , सहकार मंत्री, सहकार आयुक्त पुणे व पोलीस अधीक्षक पुणे यांना दलित विद्यार्थी कोब्रा संघटनेकडून निवेदन देण्यात आले असून बुलडाणा अर्बन च्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शाखेतून लाहोटी दाम्पत्यांना गैरकायदेशीर कर्ज वाटप, पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशन अंतर्गत अनिल मर्दा यांचे 90 लाखांची ठेवी परत न दिल्या कारणाने डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये दि. 23 सप्टेंबर 2017 अपराध क्रमांक
246/2017 भादवी चे कलम 403,406,409,420 + 34 अन्वेय बुलडाणा अर्बन विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. याचा परिणाम म्हणजे या कालावधीत काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्याने जवळपास 700 ते 800 कोटींची ठेवी ठेवीदारांनी काढून घेतली आहे. तरी, बुलडाणा अर्बनमध्ये ठेवलेल्या सोन्याची व नियम बाहय कर्ज प्रकरणाची सीआयडी चौकशी व बुलडाणा अर्बन रिजनल अधीकारी (RO) यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अन्यथा दलित विद्यार्थी कोब्रा संघटनेच्या वतीने शाखा तिथे लोकशाही मार्गाने जन आंदोलने सुरू करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

https://youtu.be/8UzXDdguaTk

...Read More

V. S. News
विधवा महिलांना पेन्शन पत्राचे वाटप

व्हीएस न्यूज - संजय गांधी विधवा व निराधार अनुदान योजनेअंतर्गत पिंपरी मतदारसंघातील 85 महिलांना पेन्शनपत्राचे वाटप माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
संत रविदास विचार समितीच्या वतीने प्राधिकरण येथे आयोजित चर्मकार समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळयासाठी शिंदे येथे आले होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील उपेक्षित वर्गाला या योजनेतून मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, संजय गांधी अनुदान प्रकरणे तातडीने मंजूर करण्याचे शासनाचे आदेश असून महिलांनी आपले प्रस्ताव जमा करावेत असे आवाहन घोलप यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
पालिकेच्या निष्काळजीपणामुळे बीएसएनएलची लाईन बंद

व्हीएस न्यूज - महापालिकेच्या क प्रभागाअंतर्गत महात्मा फुले पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या रस्ते खोदाईमुळे बीएसएनएलची केबल तुटल्याने मंगळवारी दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीजे चेंबर्ससह गांधीनगर परिसरातील टेलिफोन व इंटरनेट बंद होते. याबाबत बीएसएनएलला कोणतीही पुर्वसुचना देण्यात आली नव्हती. पालिकेच्या अशा निष्काळी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क प्रभागाच्या ड्रेनेज विभागाअंतर्गत पिंपरीतील महात्मा फुले पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी मुख्य रस्ता खोदण्यात येत आहे. परंतू, या खोदाईमध्ये बीएसएनएलसह आदी केबल तुटल्या. यामुळे पीजे चेंबर्स व गांधीनगर परिसरातील बीएसएनएलची केबल तुटून टेलिफोन सेवा व इंटरनेट सेवा बंद झाली होती. पीजे चेंबर्समध्ये विविध वर्तमान पत्रांच्या कार्यालयासह आदी महत्वाची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयाची टेलिफोन व इंटरनेट सेवा ठप्पा झाली होती. याची खराळवाडीतील भारत संचार निगम लि कार्यालयास माहिती मिळाल्याने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत दुरूस्तीचे काम हाती घेतले. परंतू, या कामाची बीएसएनएलला कल्पना दिली. त्यामुळे पालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत बीएसएनएलचे खराळवाडी येथील मंडळ अभियंता आर. आर. कातरकी म्हणाले की, महापालिकेने रस्ते खोदाई करण्यापुर्वी बीएसएनएल किंवा अन्य कोणती केबल लाईन गेली आहे का?याची माहिती घेणे गरजेचे आहे. परंतू, पालिकेचे अधिकारी अशी कधीच माहिती घेत नाहीत, अथवा संबंधितांना पुर्व कल्पनाही देत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या ड्रेनेज खोदाईमुळे बीएसएनएलचे केबल तुटून मोठे नुकसान झाले. तसेच बीएसएनएल ग्राहकांनाही त्रास झाला. यापुढे तरी रस्ते खोदाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.

...Read More

V. S. News
चिखली येथे पाण्याच्या टाकीत पडून ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना घरकुल चिखली येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी घडली.

अथर्व नितीन पाटील (वय ७, रा.घरकुल, चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व हा आपल्या इमारतीबाहेर खेळत होता. त्यावेळी त्याची आई देखील इमारतीच्या बाहेर बसली होती. खेळताना आपला मुलगा अचानक कुठे दिसेनासा झाल्याने त्याच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. घरकुलमधील इतर नागरिकही अथर्वच्या शोधासाठी धावाधाव करू लागले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरकुलच्या बाजूला असलेल्या एका बांधकाम साइटवर पाण्याच्या टाकीत चप्पल तरंगतांना आढळून आली. यामुळे पोलिसांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता अथर्व बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.

...Read More

V. S. News
महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन

आमदार महेश लांडगे यांचे आयुक्तांना निवेदन

व्हीएस न्यूज - भगवान महावीर जयंती निमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. महावीर जयंती अंहिसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरीता शहरातील मटण, चिकन व मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महावीर स्वामी यांनी जिओ और जीने दोहा संदेश संपूर्ण जगाला दिला. याच अनुषंगाने या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे. जैन बांधवही या शहरात गुण्या गोविंद्याने राहत आहेत. सर्व समाजबांधव आपआपले सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महावीर जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी एकोपा दाखवला पाहिजे.

ब्रिटीश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने महावीर जयंतीला सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही जैन बांधवांच्या भावनांचा विचार करुन सर्व समाज बांधवांनी मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवावे. त्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घेवून संबंधित विक्रेत्यांना आवाहन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

भोसरीत अहिंसा रॅलीचे आयोजन

दरम्यान, पिंपरी चिंचवड जैन महासंघाने भगवान महावीर जयंतीनिमित्त दि. २३ मार्चपासून २९ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कासारवाडी येथील पगारिया सभागृहात अहिंसा सप्ताह व नवकार महामंत्र जपाने उत्सवाचा शुभारंभ झाला. दि.२९ रोजी दिगंबर जैन मंदिर निगडी अरिहंत व जैन मंदिर चिंचवड, रामस्मृती लॉन्स भोसरी येथे रक्‍तदान व नेत्रदान शिबीर, मोहननगर येथे जैन वसतीगृह व मोरया मंदिर परिसरातील समरथ संस्था गुरुकुल येथे फळ वाटप होणार आहे. तसेच, दि.२९ मार्चला महावीर जयंतीच्या मुख्य दिवशी दुपारी चार वाजता निगडी येथे जैन मंदिरात अहिंसा रॅली व अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे सायं.६ वाजता समारोप होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन महासंघाचे अध्यश वीरेंद्र जैन यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
ह्युंदाई कारचा ‘फ्री कार केअर क्लिनिक’चा सप्ताह

व्हीएस न्यूज - ह्युंदाईच्या ग्राहकांसाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान कंपनीच्या वतीने फ्री कार केअर क्लिनिक’ (चेकअप) सप्ताहामध्ये कारची मोफत तपासणी करुन दिली जणार आहे. कुंदनच्या चिंचवड़ थरमॅक्स चौक, चाकण, पिंपळे सौदागर आणि बावधन शोरूममध्ये मगंळवारी उद्घाटन करण्यात आले असून या ठिकाणी सेवा मिळणार आहे.

देशातील अग्रगण असणाऱ्या आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे देशभरात २६ व्या फ्री कार केअर क्लिनिकची घोषणा केली आहे. ग्राहकांना याचा चांगला फायदा होणार आहे. हा ग्राहक जोडणी हा उपक्रम २७ मार्च ते ५ एप्रिल २०१८ दरम्यान देशभरातील सर्व सव्हिस सेंटरवर (सेवा आउटलेट) आयोजित केला आहे. २६ व्या FCCC चे उद्घाटन चिंचवड़ थरमॅक्स चौकातील कुंदन कार प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मध्ये निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुळे व कुंदन ह्युंदाईचे संचालक हितेश चड्डा, राजकुमार चड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मोफत कार केअर क्लिनिक मध्ये इंजिन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल सिस्टिम, अंडर-बॉडी, एसीचे चेकिंग केले जाणार आहे. यासोबत ग्राहकाना स्पेयर पार्ट्स, लेबर चार्ज आणि अन्य सेवांवर आकर्षक सवलत दिली जनार आहे. तसेच वॉरंटी आणि रोड साइड असिस्टन्स प्रोग्रॅमसाठीही आकर्षक सवलत देऊ केली आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त दिवसांची वाहने असलेल्या ग्राहकांना खास सवलत आहे. हितेश चड्डा म्हणाले, उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे वाहनांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आम्ही कुंदनच्या चिंचवड, पिंपळे सौदागर, चाकण आणि बावधन शोरूम मध्ये ग्राहकांना आकर्षक सवलत देत आहे, त्याचा फायदा सर्वानी घ्यावा.

पळसुळे म्हणाले, ह्युंदाई कंपनीच्या कार चांगल्या आहेत. आपल्याकडील कारची वेळेवर देखभाल केल्यास तिचे आयुष्य वाढते. सध्या सुरु असलेल्या ह्युंदाई फ्री कार केअर क्लिनिकचा फायदा करुन घ्यावा

...Read More

V. S. News
शिवसेनेकडून वाकड पोलीसांचा सत्कार

व्हीएस न्यूज - तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लग्नाची तारीख जवळ येत असल्याचे पाहुन आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेली इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी राहत्या घरातून न सांगता निघुन गेली होती. ही गोष्ट आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन दिवसात मुलीला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

यानिमित्त शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिव व्यापारी सेना उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, भरत महानवर,नरसिंग माने, रविकिरण घटकार, भालचंद्र फंडतळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!