व्हीएस न्यूज - बुलडाणा बँकेच्या भ्रष्ट्राचारविरोधात कोब्रा संघटना प्रमुख नेताजी चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱयांनी एल्गार पुकारला आहे. या प्रकरणी राळेगण यादव मंदिरात जाऊन पदाधिकाऱयांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन अर्धा तास बुलडाणा अर्बन घोटाळ्या विषयी चर्चा केली. तसेच बुलडाणा अर्बन बँक घोटाळ्याविरोधात दलित विद्यार्थी संघटनेने जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांनी नेताजी चव्हाण यांच्याकडील घोटाळ्याची कागदोपत्री पाहणी करून जन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. सहकार आयुक्तांची दिल्ली येथे भेट घेऊन संबंधितांवर कारवाई, तसेच बुलडाणा अर्बनवर प्रशासक नेमणे व सुपर ऑडीटची मागणी करणार असल्याचे जाहीर केले.
या संदर्भात, म.रा.मुख्यमंत्री , सहकार मंत्री, सहकार आयुक्त पुणे व पोलीस अधीक्षक पुणे यांना दलित विद्यार्थी कोब्रा संघटनेकडून निवेदन देण्यात आले असून बुलडाणा अर्बन च्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शाखेतून लाहोटी दाम्पत्यांना गैरकायदेशीर कर्ज वाटप, पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशन अंतर्गत अनिल मर्दा यांचे 90 लाखांची ठेवी परत न दिल्या कारणाने डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये दि. 23 सप्टेंबर 2017 अपराध क्रमांक 246/2017 भादवी चे कलम 403,406,409,420 + 34 अन्वेय बुलडाणा अर्बन विरोधात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. याचा परिणाम म्हणजे या कालावधीत काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्याने जवळपास 700 ते 800 कोटींची ठेवी ठेवीदारांनी काढून घेतली आहे. तरी, बुलडाणा अर्बनमध्ये ठेवलेल्या सोन्याची व नियम बाहय कर्ज प्रकरणाची सीआयडी चौकशी व बुलडाणा अर्बन रिजनल अधीकारी (RO) यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अन्यथा दलित विद्यार्थी कोब्रा संघटनेच्या वतीने शाखा तिथे लोकशाही मार्गाने जन आंदोलने सुरू करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002