व्हीएस न्यूज - खेळताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना घरकुल चिखली येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी घडली.
अथर्व नितीन पाटील (वय ७, रा.घरकुल, चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व हा आपल्या इमारतीबाहेर खेळत होता. त्यावेळी त्याची आई देखील इमारतीच्या बाहेर बसली होती. खेळताना आपला मुलगा अचानक कुठे दिसेनासा झाल्याने त्याच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. घरकुलमधील इतर नागरिकही अथर्वच्या शोधासाठी धावाधाव करू लागले.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरकुलच्या बाजूला असलेल्या एका बांधकाम साइटवर पाण्याच्या टाकीत चप्पल तरंगतांना आढळून आली. यामुळे पोलिसांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता अथर्व बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यास त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002