व्हीएस न्युज - बेकायदेशीर रित्या जमाव जमवून घरात घुसून घरातील पुरुष ,महिला आणि लहान मुलांना मारहाण करून घराचा ताबा घेण्याची घटना १३ मार्च रोजी लोहगाव येथील कलवड (विकासनगर) वस्ती येथे घडली.
मोहम्मद अली आणि नबीउनीसा इशरात अली यांनी लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्यात मारेकरी शकीलअहमद शेख ,केतन मारणे ,सुरज टिंगरे ,दुबे आणि तिवारी आणि त्यांचा बरोबर असलेल्या दोन महिलांच्या विरोधात फिर्याद दिली .लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी दुबे आणि तीवरी यांच्यावर तक्रार क्र -८०/२०१८ कलम १४३/१४७/१२३/४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी अर्धवट कारवाई केल्या मुळे उर्वरित मारेकरी ज्यांच्यावर गुन्हे दाखल न करता सोडण्यात आले ,त्यांनी १८ मार्च रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान घरात घुसून पुन्हा घराची तोड फोड करत घरातील परिवाराला मारहाण केली , महिलांना धक्का बुक्की करत शिवीगाळ केली. अद्याप या मारेकऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही व त्यांचे पाठराखण करत आहेत अशी तक्रार नबीउनीसा इशरात अली यांनी व्यक्त केली .उर्वरित मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद होणे बाबत चा अर्ज पोलीस आयुक्तांना केला आहे. गेले दोन वर्षा पासून नबीउनीसा यांचे पती घरी परतले नाही व शकील अहमद शेख ,दुबे आणि तिवारी यांच्यावर संशय आहे असे त्या म्हणाल्या.
पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्या कडून प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांना मिळालेल्या महिती नुसार सदरची बाब ही घराच्या व जागेच्या वादातून निर्माण झाली आहे. ते म्हणाले कि सदरचे घर हे कोणाच्या मालकीचे आहे हे न्यायालय ठरवेल. आणि या वादातून काही अनुचित प्रकार घडू नयेत या साठी प्रयत्न करीत आहोत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002