Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, एकजण गंभीर

व्हीएस न्युज-चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ग्रेड सेपरेटरमध्ये अडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी पाचच्या सुमारास पिंपरी ग्रेडसेपरेटर येथे झाला.

शिवम जाधव (वय 20 राहणार - खराळवाडी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालक तरुणाचे नाव आहे. तर हृषीकेश पवार गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने एक मारुती एस एक्स 4 (एम एच 04 / ए डी 8461) कार भरधाव वेगात जात होती. कार पिंपरी ग्रेडसेपरेजटजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकावरील खांबाला धडकली. कार भरधाव वेगात आसल्याने दुभाजकावरून सुमारे 500 मीटर घसरत गेली. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला हृषीकेश पवार गंभीर जखमी झाला.

अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गाडी कापून कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
निराधार लोकांच्या सहवासात वाढदिवस साजरा 

व्हीएस न्यूज - मुलांना सामाजिक जाणीव व मानवी मूल्य संस्कार , आदर्श यांची ओळख व्हावी यासाठी चिंचवड येथील अंशुल जगताप याचा १२ वा वाढदिवस वृद्धाश्रमातील नागरिकांसमवेत साजरा करण्यात आल्याची आगळीवेगळी घटना मंगळवारी रुपीनगर येथे घडली.

पिंपरीचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी आपला मुलगा अंशुल याचा वाढदिवस रुपीनगर येथील किनारा वृद्धाश्रमात साजरा केला. समाजातील दुःख, शोषितांचे प्रश्न व वृद्धापकाळातील जीवनपद्धती याची ओळख आपल्या मुलांना व्हावी यासाठी विजय जगताप यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये अथवा बडेजाव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन आपल्या सर्व कुटुंबासह वृद्धाश्रमात जाऊन केके कापला व सर्वांना अन्नदान केले.

जागतिक मदर्स डे च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजू शिवतारे ,अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे , विष्णू मांजरे , नितीन घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका संचालिका प्रीती वैद्य यांनी सर्वांचे स्वागत केले तर तृप्ती वाघमारे यांनी आभार मानले .

https://youtu.be/V7SnkH648Zo

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या इमारतीचे बांदकामा होणेकामी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात यावे - अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार

https://youtu.be/ERz5aCFWWsA

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी येथे पेठ क्र. १४ बोर्हाडेवाडी येथे न्यायालयासाठी सुमारे १५ एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे.

गेले तीन वर्षांपासून मंजुरी मिळूनही निधीअभावी न्यायालयाच्या इमारतीचे बांदकाम करता येत नसल्याची स्तिथी आहे. सुमारे २२ लाख लोकसंख्येच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये न्यालालायीन कामकाजासाठी स्वतंत्र व अद्यावत इमारतीची आवश्यकता आहे.

न्यायालयाच्या इमारतीचे चर्चा होऊन बांदकामा होणेकामी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याची विनंती पिंपरी विधानसभेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी महाराष्ट्र शासनाचे विधी व न्याय राज्यमंत्री मा. रणजित पाटील यांच्या कडे निवेदना द्वारे केली.

...Read More

V. S. News
पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानात उन्नती सोशल फाऊंडेशन प्रथम

व्हीएस न्यूज - जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशने चला गावाकडेहा उपक्रम हाती घेतला आहे. या दिवशी महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या आवाहनाला साथ देत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सुमारे २०० सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात श्रमदान केले. या स्पर्धेत उन्नती सोशल फाऊंडेशनला प्रथम क्रमांक मिळाला.

राज्यात पाण्याचे संकट मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. यावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशने मागील अनेक वर्षांपासून राज्यातील खेड्यापाड्यात श्रमदानातून जमिनीत पाणी जिरविण्यासाठी शेतात, माळावर सोर्स खडे तयार केले जात आहेत. जेणे करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यासाठी पाणी फाऊंडेशन दिवसरात्र काम करीत आहे. याला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त एका अनोख्या प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. चला गावाकडे

अशी हाक देताच राज्यातील अनेक गावांत या दिवशी लाखो नागरिकांनी सहभाग नोंदविला. शेतकर्याप्रती आपले योगदान दिले. अनेक गावांत स्पर्धा घेण्यात आल्या ज्या टीमने चांगले व जास्त काम केले, अशा टीमला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात ठिकठिकाणच्या १८ गटातून सुमारे ६०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी गावकार्यानी कामाची पाहणी करून स्पर्धेचे बक्षिस जाहीर केले. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनला मिळाला. संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे यांना पानवडीचे सरपंच सुषमा भिसे व पुरंदर पंचायत समिती सदस्य नलिनी लोळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

यावेळी उपसरपंच संदीप भिसे, ग्रामपंचायत सदस्य अनिता लोळे, मंगल दिवार, निवृत्ती लोळे, सुरेखा लोळे, रामदास भिसे, माजी सरपंच हरिभाऊ लोळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव भिसे, अनिल भिसे, आबा लोळे, अमोल लोळे, रमेश दिवार यांच्यासह ग्रामस्त व महाश्रमदानासाठी आलेले नागरिक, योगा हास्य क्लब पिंपळे सौदागर सदस्य व उन्नतीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

समाजासाठी बांधिलकी आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ही भावना सध्या अनेकांच्या मनात जागृत होत आहे. पाणी फाऊंडेशने एक दिवस महाश्रमदान अशी हाक देताच अगदी लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनीच उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. प्रत्येकांनी जमेल तेवढे श्रमदान केले, त्यामुळे समाजातील शेतकऱ्याबद्दलच्या भावना जागृत होत आहे. आणि सामाजिक बांधिलकी काय आहे याची जाणीव होत आहे.

...Read More

V. S. News
स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांना भाजपातर्फे अभिवादन

व्हीएस न्यूज - स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देऊन पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे जनसेवक होते. राजनिती तज्ञ, डावा हात वर करून भाषण करायची त्यांची लकब वेगळीच होती. नुसती विरोधकांवर टीका करणारी भाषणे न करता, विरोधकांच्या मर्मावर घाला घालणारी आणि लोकांना सोप्या भाषेत स्वतःचे म्हणणे पटवून देणारी भाषणे देणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन होते. मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा त्याचे प्रमुख प्रमोद महाजन होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांच्या विषयी सांगितले होते की, “जरी प्रमोद महाजन बीजेपीमध्ये नसते तरीही ते, भारतातील असंख्य सामान्य युवकांना प्रेरणास्थान राहिले असते.अशा लोकनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शितल शिंदे, प्रियांका बारसे, प्रमोद निसळ, चेतन घुले, राजू सावंत, विजय लांडे, कैलास कुंजीर, प्रदिप बेंद्रे, नंदू भोगले, संजीवनी पांडे, सुरेश वाडकर, रामकृष्ण राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

...Read More

V. S. News
चिखलीत विजेचा ‘धक्का’ लागून कामगाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - पाण्याची टाकी साफ करत असताना विजेचा धक्का बसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिखली घरकुल प्रकल्पाजवळ घडली.

अमर खिलारे (वय २५. रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सिद्धार्थ काळे (वय ३०) हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या मागे आशीर्वाद या नावाने सोसायटी आहे. अमर आणि सिद्धार्थ शुक्रवारी सकाळी सोसायटीतील पाण्याची टाकी मशिनच्या सहाय्याने साफ करत होते. त्यावेळी अचानक विजेचा धक्का अमर आणि सिद्धार्थ या दोघांना बसला. तसेच वीज प्रवाह पाण्यात उतरला. दोघेही टाकीत पडले. त्यात अमर याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सिद्धार्थ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

...Read More

V. S. News
सोशल मीडियाचा वापर गांभीर्याने करणे आवश्‍यक – शेफाली वैद्य

व्हीएस न्यूज - फेसबुक किंवा व्हॉट्‌सऍपवरील पोस्टला लाईक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्‍यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमांचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम दिसत असले तरीही सकारात्मक उपयोग अधिक होत आहे, असे मत प्रसार माध्यमातील जाणकार शेफाली वैद्य यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले .

निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ ते ५ मे या कालावधीत ३४ व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोशल मीडिया-संधी व आव्हानेया विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे, इंद्रायणी बँकेच्या संचालिका सुवर्णा झोळ, विनीता श्रीखंडे, अॅड. पद्मजा शिंदे, विनिता पाचरने, मिलिंद देशपांडे, सावरकर मंडळाचे अध्यक्ष एस.बी.पाटील, उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, कार्याध्यक्ष विनोद बंन्सल, सचिव भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.

वैद्य पुढे म्हणाल्या की, ट्‌विटरच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट करून देण्याचा मार्ग सोशल मीडियात उपलब्ध झालेला आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी, पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री किंवा उच्चपदस्थ व्यक्ती ट्‌विट करून आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ट्‌विटरवर आलेल्या ट्टिटला रिट्विट करून त्याचे उत्तर अथवा प्रतिक्रियाही देण्याची व्यवस्था यात आहे. ट्‌विटरच्या माध्यमाने आलेल्या प्रतिक्रियेला अलीकडच्या काळात अधिक महत्व निर्माण झालेले आहे. त्यामुळे अनेक वेळा तात्काळ मदत उपलब्ध होऊन पुढील दुर्घटना टाळण्यास मदत होते. हे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. ट्‌विटरवर फोटो, व्हीडीओ क्‍लिप टाकण्याचीही व्यवस्था असल्याने फेसबुक,व्हॉट्‌सऍपप्रमाणे हेही अत्यंत लोकप्रिय माध्यम झालेले आहे.

हल्ली जगात कुठेही घडलेले अपघात, घातपात, हल्ले, बॉम्बस्फोट अशा कोणत्याही दुर्घटनांचं वृत्त त्या घडल्याच्या काही क्षणांमध्ये सोशल मीडियावर येतं. ही बातमी कोण्या वार्ताहरानं केलेली आणि संपादकानं तपासून जबाबदारीनं दिलेली असतेच असं नाही. बहुसंख्य वेळा त्या घटनेमध्ये असलेल्या किंवा प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही बातमी पसरते. घटना अनुभवणारे किंवा प्रत्यक्ष पहाणारे त्यांना दिसणाऱ्या गोष्टी किंवा घटना पोस्ट करत राहतात. नेमकं काय घडत आहे आणि ते का घडत आहे याचा सर्वंकष विचार ते त्या क्षणी करू शकत असतातच असं नाही. त्यामुळे कुठेतरी काहीतरी भीषण घडलं आहे, घडत आहे हे सोशल मीडियावर लगेच पसरतं. परंतू त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. पण नेमकं काय घडलं आणि ते का हे समजण्यासाठी मात्र अनेक तुकड्यांमधली माहिती एकत्र जोडून पाहावी लागते किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहून एखाद्या जबाबदार वर्तमानपत्रात आलेलं वृत्तांकन वाचावं लागतं.

तंत्रज्ञान हे चांगलेच असते पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला. तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला. तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता कधी कधी लोकांच्या भावना भडकावण्यासाठीही केला जातो. याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत. हेही तितकेच खरे आहे. मात्र असे असले तरीही,सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, तो विधायक घटनांच्या बाबतीत शेअरिंग करणे होय.

अनुजा वनपाळ यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा बिबीकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा सांगळे यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांची कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरूची मावशी’, ‘उघडले स्वर्गाचे दारही नाटके गाजली होती.

दर्जेदार नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ नाट्दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कोल्हटकर यांचा मुलगा अमेरिकेवरुन रात्री उशिरापर्यंत पुण्यात येणार आहे. शनिवारी कोल्हटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

मराठी रंगभूमीवर करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात होते. शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. रंगभूमीवर कवडी चुंबक, राजाचा खेळ, मोरुची मावशी, बिघडले स्वर्गाचे दार ही त्यांची नाटके प्रेक्षकांना भावली होती. मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांच्या निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.

...Read More

V. S. News
जेष्ठ वकिलाला महिलेकडून पिंपरी न्यायालयाच्या आवारात मारहाण

वकिलाला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बार असोसिएशनकडून निषेध

व्हीएस न्युज - पिंपरी न्यायालयात जेष्ठ विधीज्ञ गोविंद माधवराव भालेराव ( वय -६३ वर्षे ) हे धुमकेकर कोर्ट येथील कामकाज उरकून बाहेर आले असता कंटेम ऑफ कोर्ट मधील विरोधी पक्षकर गीता अशोक व्यास यांनी लाथा बुक्क्यांने मारहाण केली. शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजता च्या दरम्यान कोर्टाच्या आवरामध्ये हा प्रकार घडला.

जेष्ठ विधीज्ञ गोविंद माधवराव भालेराव यांना मारहाण केल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनने पोलिसांकडे केली आहे. या मारहाणीचा बार असोसिेएशनने सभा घेऊन निषेध केला आहे.

यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे शिस्तपालन समितीचे सदस्य अॅड.अतीश लांडगे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच, संबंधित महिलेच्या विरोधात कायदेशीर तक्रार पिंपरीतील संत तुकाराम पोलीस चौकीत देण्यात आली व कलाम -३२३/५०४/५०६/४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे, सचिव अॅड. तुकाराम पडवळे, ऑडीटर अॅड. गणेश राऊत, अॅड. प्रसन्न लोखंडे, अॅड.रविराज मीरचंदानी, अॅड.सुनील कड, अॅड.सुनील कडूसकर, अॅड.देविदास कुदळे, अॅड.सविता तोडकर, अॅड.शशिकांत गावडे, अॅड.मयूर लोढा, अॅड. योगेश थंबा, अॅड.संभाजी बवले आदी उपस्थित होते.

https://youtu.be/mdxeRavnshQ

...Read More

V. S. News
पुण्यात कृषी आंबा महोत्सवाला आग

व्हीएस न्यूज - पुण्यातील मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी आंबा महोत्सवाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत सर्व स्टॉल्स जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये 50 पेक्षा अधिक स्टॉल्स होते. त्यामुळे महोत्सवात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या लाकडी पेट्या आणि टोपल्याची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

या ठिकाणी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. लाकडी पेट्या, टोपल्या आणि गवतामुळे मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणात सर्व स्टॉल्स आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. चार अग्निशामक गाडीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना - सचिन साठे

व्हीएस न्यूज - केंद्रात व राज्यात भाजपा सेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाली. तर पिंपरी चिंचवड मनपात भाजपाला एक वर्ष झाले. एक वर्षापुर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आरोप करणारे भाजपा सेनेच्या पदाधिका-यांनी नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत बहुमताच्या जोरावर वेस्ट टू एनर्जीसारखी कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचाराची कामे मंजूर करुन घेतली. त्यामुळे मतदारांमध्ये वेस्ट ऑफ वोटची भावना निर्माण झाली आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी चिंचवड मनपाच्या मागील सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपो येथे उभारण्यात येणा-या वेस्ट टू एनर्जीप्रकल्पाची निविदा भाजपाने बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतली. त्यानंतर भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी व शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी शहर प्रमुखांसमवेत पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प वेस्ट टू मनीअसल्याचा आरोप केला. यावर सचिन साठे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपामध्ये भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांवरुन शिवसेना भाजपमध्ये सुरु असणारा कलगीतुराम्हणजे वेस्ट ऑफ वोटअशी मतदारांची भावना झाली आहे. शिवसेना मनपामध्ये विरोध केल्याचे चित्र निर्माण करते व प्रत्येक वेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देते. देशात, राज्यात हे सत्तेचे भागीदार,मनपात टक्केवारीत हिस्सेदार. आता शिवसेनेने आंदोलन करायचेच असेल तर भाजपालाही बरोबर घेऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच जाऊन आंदोलन केले तरच कदाचित त्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या खासदारांना व नगरसेवकांना खरोखरच हा प्रकल्प रद्द व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी नाणारप्रकल्पाप्रमाणे वेस्ट टू एनर्जीप्रकल्प देखील पर्यावरण मंत्र्यांकडून रद्द करुन आणावा व नागरिकांचा विश्वास संपादन करावा.

65 वर्षांच्या इतिहासात कॉंग्रेस सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचेच कार्यकर्ते सत्तेसाठी उपोषणास बसले असे कधी घडले नाही. प्रभाग समित्यांवर आपली वर्णी लागली नाही म्हणून भाजपाच्या निष्ठावंतांनी केलेले आमरण उपोषण अवघ्या बारा तासातच गुंडाळले. तत्वांचे आणि शिस्तिचे गोडवे गाणा-या व पार्टी विथ डिफरन्सअसे बिरुद मिरविणारे सत्तेसाठी कोणत्या थराला जातील हे त्यांनी अवघ्या एक वर्षात दाखवून दिले आहे. लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणूकीपूर्वी मतदारांना दिलेले एकही आश्वासन भाजप सेनेला पुर्ण करता आले नाही. हे अपयश झाकण्यासाठी भाजप सेनेने केलेला हा शोआहे. अशीही टिका साठे यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले पतमानांकन, महागाईचा उसळलेला आगडोंब, बेरोजगारीत झालेली वाढ, शेतक-यांच्या आत्महत्या, देशभर कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि शहरातील नागरिकांना भेडसावणा-या शास्तीकराच्या समस्या, अनधिकृत बांधकाम, रेझ झोन, बीआरटी, चौविसतास मुबलक स्वच्छ पाणीपुरवठा या समस्या अद्याप सुटल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक मतदारांसह देशभरातील मतदारांमध्ये आता वेस्ट ऑफ वोटची भावना निर्माण झाली असल्याचीही टिका साठे यांनी केली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!