व्हीएस न्यूज - पाण्याची टाकी साफ करत असताना विजेचा धक्का बसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिखली घरकुल प्रकल्पाजवळ घडली.
अमर खिलारे (वय २५. रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सिद्धार्थ काळे (वय – ३०) हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखलीतील घरकुल प्रकल्पाच्या मागे आशीर्वाद या नावाने सोसायटी आहे. अमर आणि सिद्धार्थ शुक्रवारी सकाळी सोसायटीतील पाण्याची टाकी मशिनच्या सहाय्याने साफ करत होते. त्यावेळी अचानक विजेचा धक्का अमर आणि सिद्धार्थ या दोघांना बसला. तसेच वीज प्रवाह पाण्यात उतरला. दोघेही टाकीत पडले. त्यात अमर याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सिद्धार्थ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002