व्हीएस न्यूज - मुलांना सामाजिक जाणीव व मानवी मूल्य संस्कार , आदर्श यांची ओळख व्हावी यासाठी चिंचवड येथील अंशुल जगताप याचा १२ वा वाढदिवस वृद्धाश्रमातील नागरिकांसमवेत साजरा करण्यात आल्याची आगळीवेगळी घटना मंगळवारी रुपीनगर येथे घडली.
पिंपरीचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी आपला मुलगा अंशुल याचा वाढदिवस रुपीनगर येथील किनारा वृद्धाश्रमात साजरा केला. समाजातील दुःख, शोषितांचे प्रश्न व वृद्धापकाळातील जीवनपद्धती याची ओळख आपल्या मुलांना व्हावी यासाठी विजय जगताप यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये अथवा बडेजाव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन आपल्या सर्व कुटुंबासह वृद्धाश्रमात जाऊन केके कापला व सर्वांना अन्नदान केले.
जागतिक मदर्स डे च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजू शिवतारे ,अॅड. लक्ष्मण रानवडे , विष्णू मांजरे , नितीन घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका संचालिका प्रीती वैद्य यांनी सर्वांचे स्वागत केले तर तृप्ती वाघमारे यांनी आभार मानले .
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002