व्हीएस न्यूज - स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी आमदार जगताप म्हणाले, दिवंगत लोकनेते प्रमोद महाजन हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देऊन पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे जनसेवक होते. राजनिती तज्ञ, डावा हात वर करून भाषण करायची त्यांची लकब वेगळीच होती. नुसती विरोधकांवर टीका करणारी भाषणे न करता, विरोधकांच्या मर्मावर घाला घालणारी आणि लोकांना सोप्या भाषेत स्वतःचे म्हणणे पटवून देणारी भाषणे देणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन होते. मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा त्याचे प्रमुख प्रमोद महाजन होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांच्या विषयी सांगितले होते की, “जरी प्रमोद महाजन बीजेपीमध्ये नसते तरीही ते, भारतातील असंख्य सामान्य युवकांना प्रेरणास्थान राहिले असते.” अशा लोकनेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शितल शिंदे, प्रियांका बारसे, प्रमोद निसळ, चेतन घुले, राजू सावंत, विजय लांडे, कैलास कुंजीर, प्रदिप बेंद्रे, नंदू भोगले, संजीवनी पांडे, सुरेश वाडकर, रामकृष्ण राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002