Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
चिंचवड येथील भीमनगर मधील चेंबर कडे प्रशासन ,आरोग्य विभाग ,नगरसेवक यांचे यांचे दुर्लक्ष.

व्हीएस न्यूज - चिंचवड मध्ये भीमनगर येथे असलेले चेंबर हे फुटलेल्या अवस्थे मध्ये आहे ,त्या कडे प्रशासन ,आरोग्यविभाग व नगरसेवक लक्ष्य देत नाहीत . त्या मुळे परिसरातील नागरीकांना त्या चेंबरचा वास येतो आहे . प्रशासनाला कळवून पण लक्ष दिले गेले नाही, तरी संबंधीत आधिकाऱ्यांनी लक्ष घालून होणाऱ्या रोगांपासून मुक्त करावे. आरोग्य, प्रशासन इकडे लक्ष देत नसल्याने तेथील नागरिकांना चेंबरचा वास सहन करावा लागत आहे. ह्या चेंबरच्या वासा मुळे आणि साठलेल्या सांड पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना डेंगू अथवा इतर रोग झाल्यास यांना जबाबदार कोण ?अशी मागणी परिसरात केली गेली तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन होणारी रोगराई थांबवावी .
...Read More

V. S. News
कीर्तनकार शेलारमामांच्या नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द...पुणे विद्यापीठाचे अखेर एक पाऊल मागे

व्हीएस न्यूज - फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द करण्‍याचा निर्णय घेतला आहे.शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांनी घातलेली आहे. विद्यापीठाने नाही. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.
शेलारमामा हे हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यापीठाकडून लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या आधारे अशा प्रकारचे 40 पुरस्कार दिले जातात. या सर्व पुरस्कारांच्या नियम आणि अटींचा नव्याने आढावा घेतला जाईल. विद्यापीठाची भूमिका सुधारणावादी असल्याचे कुलगुरु यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
...Read More

V. S. News
हिशोब न दिल्याने 88 उमेदवारांवर तीन वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

व्हीएस न्यूज - महापालिका सार्वत्रिक निवडणुक निकालानंतर 30 दिवसात 88 उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्या उमेदवारांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी पालिका निवडणूक विभागास पाठविली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. 23 फेब्रुवारी 2017 रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानूसार 25 मार्च 2017 पर्यंत विहित मुदत देण्यात आली होती. परंतू, निवडणूक लढविलेल्या 88 उमेदवारांनी निवडणूक खर्चांचा हिशोब सादर केलेला नव्हता. त्यानूसार 88 उमेदवारांची विहित कार्यपध्दतीनूसार नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीस अनेक उमेदवार गैरहजर राहिले.

राज्य निवडणूक आयोगाने 5 जून 2010 आणि 10 ऑगस्ट 2015 आदेशान्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 10(1ई) नूसार अनर्ह करण्यात आलेल्या उमेदवारांचे आदेश राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी 88 उमेदवारांना रकाना क्रमांक 6 मध्ये नमूद आदेशानूसार तीन वर्षे कालावधीकरिता पालिका सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादी काँग्रेसचा हंडा मोर्चा

व्हीएस न्यूज - अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये गेल्या महिन्याभरापासून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबाबत फ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन दखल घेतली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे शुक्रवारी (दि.10) हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास फ-प्रभाग कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग अध्यक्षा गंगा धेंडे, कविता खराडे, पुष्पा शेळके, रेश्‍मा पठाण, पल्लवी साखळे, शिला भोंडवे, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, दिपाली देशमुख, रेश्‍मा पठाण, संजय धेंडे, नवनाथ कांबळे, शिरीष आवाळे, दत्ता कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चो काढून फ क्षेत्रीय कार्यालय कामकाजाचा निषेध करण्यात आला. यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डींगमध्ये पाणी पुरवठा अनेक महिन्यांपासून सुरळीत होत नाही, तेथील रहिवासी कुंटूंबाची पाण्यावाचून वणवण सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही वारंवार होणारे दुर्लक्षामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चो काढून निषेध केला आहे. तसेच दोन दिवसात पाणी पुरवठा सुरु न केल्यास प्रभागाला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

...Read More

V. S. News
नद्यात सोडणारे मैलामिश्रित पाणी थांबवावे

व्हीएस न्यूज सांगवी येथील मुळा व पवना नदीपात्रात मैलामिश्रित पाणी थेट सोडण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असून चेंबर दुरुस्त करुन नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज लाईन फुटली आहे. तेथील मैलापाणी थेट पवना नदीच्या पात्रात जात आहे. या मैला पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र दूषित होवून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय त्या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

नदीपात्रातील बहुतांश चेंबर तळाला फुटलेले असून संपुर्ण मैला मिश्रीत पाणी नदीपात्रात मिसळून पाणी दुषित होत आहे. दरम्यान, मैलायुक्त पाणी नदीपात्रात येऊनही स्थानिक नगरसेवक गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट कामामुळे ही लाईन फुटली असून त्यांचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे मैलापाणी थांबवावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
बस खरेदीसाठी “पीएमपीएमएल’ला 78 कोटी रुपये अदा

व्हीएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के स्वहिश्‍यापोटी एकूण 157 कोटी रुपये अदा करणार आहे. त्यापैकी मागील सहा महिन्यात महापालिकेने 78कोटी अदा केले आहेत. संचलन तूट, पासेस आणि बसखरेदीसाठी ही रक्कम पालिकेने दिली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक सेवा चालविण्यासाठी दोन्ही महापालिका निधी पुरवितात. त्यात पुण्याचा 60 टक्के, तर पिंपरीचा 40 टक्के हिस्सा आहे. चालू आर्थिक वर्षात संचलन तुट, बसपासेस आणि बसखरेदी या गोष्टींसाठी एकूण 156 कोटी रुपये इतका पिंपरी पालिकेचा हिस्सा दिला जाणार आहेत. त्यापैकी मागील सहा महिन्यात पिंपरी महापालिकेने एकूण 78 कोटी रुपये पीएमपीएमएलला अदा केले आहेत.

पालिकेने संचलन तुटीपोटी 42 कोटी, पासेस पोटी 16 कोटी लाख आणि बस खरेदीसाठी 20 कोटी रुपये असे एकूण 78 कोटी रुपये दिले आहेत. तर, उर्वरित सहा महिन्यात आणखी 78 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, दरवर्षी पालिका तिजोरीतून कोट्यवधी रुपये देऊनही शहरातील बससेवेमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही. शहरातील पीएमपीएमएलच्या तक्रारी सोडविल्या जात नसून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जात नाही. त्यामुळे पीएमपीएमएलच्या कारभाराबाबत सातत्याने नाराजीचा सूर आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी घेत असताना शहरामध्ये चांगली बससेवा पुरविली जावी, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

...Read More

V. S. News
ताथवडे येथील शाळा पालिकेने हस्तांतरण करावी - कैलास बारणे अपक्ष गटनेते

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ताथवडे गावचा समावेश झाल्या नंतर तेथील जिल्हा परिषदेची असलेली शाळा हस्तांतरण करण्याच्या शासन आदेशावर आक्षेप घेतल्याने त्याला स्थागिती मिळाली मात्र ही स्थागिती शासनाने नुकतीच उठवल्याने हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे . शासनाच्या आदेशातील अटी शर्तीची पूर्तता करून महापालिकेने शाळेचा ताबा त्वरित घ्यावा अशी मागणी अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे . पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत ताथवडे गाव समाविष्ट झाले आहे त्या मुळे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळेचे हस्तांतरण करण्याचा आदेश दिनांक ३० आक्टोबर २०१३ ला दिला होता त्या मुळे हि शाळा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून अटी शर्ती पूर्ण करून शाळा इमारतीचा ताबा घ्यावा अशी मागणी कैलास बारणे यांनी केली .तसेच हि शाळा शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालवावी अशीही सूचना बारणे यांनी निवेदन द्वारे केली आहे.
...Read More

V. S. News
“टाटा’ मोटर्समध्ये नैसर्गिक वायुवर चालणारा प्रकल्प

व्हीएस न्यूज - टाटा मोटर्सच्या पिंपरी उत्पादन प्रकल्पातील नैसर्गिक वायूचा वापर करुन “प्री ट्रिटमेंट’ प्रकल्पाचे उद्‌घाटन कमर्शिअल व्हेईकल प्लांटचे प्रमुख अलोक सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात लाईट,डिझेल ऑईल (एलडीओ) या पारंपारिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायूच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाची हानी कमी झाल्याने कंपनीला फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे यापूर्वी एलडीओवर चालणारे तीन ओव्हन्स्‌ नैसर्गिक वायूच्या वापरवर कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे पूर्वीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. या बदलामुळे लॉंग मेंबरच्या रंगविण्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली असून त्याबरोबर वाहनांच्या फ्रेमच्या किंमतीमध्ये सुध्दा कपात झाली आहे.

यावेळी अलोक सिंग म्हणाले की, या सुधारित प्रकल्पामुळे पर्यावरणाच समतोल राखण्यास हातभार लागणार आहे. तसेच, नवनवीन संशोधनाद्वारे हरित पर्यावरण राहण्याच्या दृष्टीने काम असेच पुढे चालू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

...Read More

V. S. News
घरकुलमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

व्हीएस न्यूज चिखलीतील घरकुलमधील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. रोहीत सुभाष कांबळे (वय 23 रा. योगायोग बिल्डींग,घरकूल चिखली) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीतचे पिंपरीतील मैत्रिणीसोबत भांडण झाले होते. त्यावेळी रोहितने तिला मारहाण केली होती. याप्रकरणी मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. रोहीतला त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली होती.

या गुन्ह्यामध्ये आपल्याला पोलीस अटक करतील या भितीने रोहीत ने आज सकाळी घऱात कोणी नसताना साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने दरवाजा ठोठावला परंतु आतून काही प्रतीसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. रोहीत हा पिंपळे गुरव येथे एका खासगी कार्यालयात काम करत होता. चिखली येथील घरकूलमध्ये तो कुटुंबियांसोबत राहत होता. निगडी पोलिस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

व्हीएस न्यूज सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती आणि सासू यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा पती निहाल विजय वेलानी (रा. आझाद हिंद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी) आणि त्याची आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्वाती निहाल वेलाणी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पंडित पाटील (वय 58, रा. देशमुख गल्ली, अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती ही पुण्यात स्वारगेट येथे एका कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी (दि. 1) ती नेहमीप्रमाणे नोकरीवर जाण्यास घराबाहेर पडली. मात्र, पिंपरी रेल्वे स्थानकावर येताच तिने जयपूर एक्‍स्प्रेस खाली आत्महत्या केली. स्वातीचे निहाल यांच्याशी तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच पती आणि सासुने फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये, असा स्वातीकडे तगादा लावला होता. त्यामुळे तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. रोजच्या या त्रासाला कंटाळून ती कामाला निघाल्यावर पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी अकराच्या सुमारास जयपूर एक्‍स्प्रेस खाली उडी घेवून तिने आत्महत्या केली.

...Read More

V. S. News
भाजप नगरसेवक कामठे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केली होती. या प्रकरणी 27 ऑक्‍टोबरला त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कामठे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

कॉंग्रेसचे सचिन साठे यांच्या तक्रारीवरुन कामठे यांचे बारावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कामठे यांनी डेक्कन येथील एम. एम. विद्यालयात शिकत असताना अकरावीच्या वर्गात ते अनुतीर्ण झाले होते. मात्र, बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करुन सांगवी येथील घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हेच प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीच्या काळात सादर केले होते. कामठे हे पिंपळेनिलख येथील प्रभाग क्रमांक 26 (ब) येथून निवडून आले आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!