ताथवडे येथील शाळा पालिकेने हस्तांतरण करावी - कैलास बारणे अपक्ष गटनेते
पिंपरी चिंचवड
2017-11-11
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ताथवडे गावचा समावेश झाल्या नंतर तेथील जिल्हा परिषदेची असलेली शाळा हस्तांतरण करण्याच्या शासन आदेशावर आक्षेप घेतल्याने त्याला स्थागिती मिळाली मात्र ही स्थागिती शासनाने नुकतीच उठवल्याने हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे . शासनाच्या आदेशातील अटी शर्तीची पूर्तता करून महापालिकेने शाळेचा ताबा त्वरित घ्यावा अशी मागणी अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे . पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत ताथवडे गाव समाविष्ट झाले आहे त्या मुळे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळेचे हस्तांतरण करण्याचा आदेश दिनांक ३० आक्टोबर २०१३ ला दिला होता त्या मुळे हि शाळा पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून अटी शर्ती पूर्ण करून शाळा इमारतीचा ताबा घ्यावा अशी मागणी कैलास बारणे यांनी केली .तसेच हि शाळा शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालवावी अशीही सूचना बारणे यांनी निवेदन द्वारे केली आहे.