व्हीएस न्यूज - फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक, असा फतवा काढल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. विद्यापीठाने कीर्तनकार शेलारमामा नावाचे सूवर्णपदक तूर्त रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.शेलारमामा पुरस्कार 2006 पासून दिले जाते. या पुरस्कारासाठी घातलेल्या अटी शेलारमामा यांच्या कुटुंबियांनी घातलेली आहे. विद्यापीठाने नाही. विद्यापीठ आहारातील भेदभाव मानत नाही. विद्यापीठाकडून शेलारमामा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु असून त्यांना शाकाहाराची अट काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.तोपर्यंत शेलारमामा पुरस्कार तूर्त मागे घेण्यात आल्याची माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे.
शेलारमामा हे हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु ठेवण्यात येईल. अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरुंनी यावेळी स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002