चिंचवड येथील भीमनगर मधील चेंबर कडे प्रशासन ,आरोग्य विभाग ,नगरसेवक यांचे यांचे दुर्लक्ष.
चिंचवड
2017-11-13
व्हीएस न्यूज - चिंचवड मध्ये भीमनगर येथे असलेले चेंबर हे फुटलेल्या अवस्थे मध्ये आहे ,त्या कडे प्रशासन ,आरोग्यविभाग व नगरसेवक लक्ष्य देत नाहीत . त्या मुळे परिसरातील नागरीकांना त्या चेंबरचा वास येतो आहे . प्रशासनाला कळवून पण लक्ष दिले गेले नाही, तरी संबंधीत आधिकाऱ्यांनी लक्ष घालून होणाऱ्या रोगांपासून मुक्त करावे. आरोग्य, प्रशासन इकडे लक्ष देत नसल्याने तेथील नागरिकांना चेंबरचा वास सहन करावा लागत आहे. ह्या चेंबरच्या वासा मुळे आणि साठलेल्या सांड पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना डेंगू अथवा इतर रोग झाल्यास यांना जबाबदार कोण ?अशी मागणी परिसरात केली गेली तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन होणारी रोगराई थांबवावी .