Breaking News

कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन |
V. S. News
पंडीत ऑटोमोटिव्हच्या मालमत्ता विक्रीस औद्योगिक न्यायालयाची तात्पुर्ती मनाई

व्हीएस न्यूज - ताथवडे येथील पंडीत ऑटोमोटिव्ह कंपनीला औद्योगिक न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत कंपनीच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा तात्पुर्ता मनाई आदेश दिला आहे. हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, अँड. गौरव पोळ, शांताराम कदम, गजानन जोध, हमिद ईनामदार आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना कैलास कदम म्हणाले की, मे. पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. या कंपनी विरूध्द त्यांच्या काही कामगारांनी दि.३० नोव्हेंबर रोजी त्यांचे थकीत असलेले ५ महिन्यांचे वेतन, दिवाळी बोनस व इतर अनुषंगिक फायदे मिळावेत यासाठी औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आदेश देताना न्यायालयाने कामगारांच्या नोकर्यांना संरक्षण दिले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी कंपनीच्यावतीने त्यांच्या अधिकार्यांनी कामगारांची बदली करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे सांगितले. न्यायालयाने ४ डिसेंबर रोजी मनाई आदेश वाढवून देऊन कामगारांच्या नोकरीस संरक्षण दिले. तरीही दि.५ डिसेंबर रोजी पंडीत ऑटोमोटिव्ह प्रा.लि. व्यवस्थापनाने सायंकाळी उशिराने तडकाफडकी टाळे ठोकल्याने ३०० कामगार रस्त्यावर आले आहेत.

न्यायालयात तक्रार अर्ज प्रलंबित असूनही कंपनीच्या अशा टोकाच्या भूमिकेमुळे कामगारांना त्यांच्या नोकरीबाबत आणि कंपनीने देय असलेल्या पगार, आणि इतर आर्थिक लाभ मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापना विरोधात हिंद कामगार संघटनेने ७ डिसेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. कामगारांचे सर्व आर्थिक लाभ आणि देयके देईपर्यंत कंपनीच्या सर्व चल आणि अचल मालमत्तांची विक्री करण्यास मनाई करण्याबाबत व कंपनीची सर्व कागदपत्रे जप्त करण्याबाबत तात्पुर्ता मनाई करावी अशी विनंती करणारा अर्ज केला. त्या अर्जावर प्रथम औद्योगिक न्यायालय श्री.एस.व्ही.सुर्यवंशी यांनी कंपनीच्या वकिलांना जाब विचारला. परंतू कंपनीने कोणतेही समाधानकारक उत्तर न देता अर्जावर जबाब देण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यावर कंपनीने जर कामगारांना त्यांचे आर्थिक देय रक्कम दिली नाही तर कामगारांकडे काय पर्याय आहे असा सवाल करून पुढिल तारखेपर्यंत कंपनीने त्यांच्या चल किंवा अचल मालमत्तेबाबत कोणाही त्रेयस्त पक्षाचा हक्क प्रस्थापित करण्यात येऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला. हिंद कामगार संघटने तर्फे अँड. गौरव पोळ यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणी येत्या दि. ५ जानेवारी रोजी होणार असल्याचे अँड.पोळ यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून करू नये - ॲड. मंजुषा इधाटे

व्हीएस न्यूज - एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये, तसेच मानवी हक्काचा वापर हत्यार म्हणून होता कामा नये, असे प्रतिपादन अॅड. मंजुषा इधाटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धा परीक्षा केंद्रात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अॅड प्रा. आण्णासाहेब ठोसर, अॅड मंजुषा इधाटे, अलका जोशी, नागरिक व अभ्यासक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी अॅड मंजुषा इधाटे म्हणाल्या, मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालयांचा उपयोग होतो. मानव अधिकार म्हणजे सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होय. सन्मानाने हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये कुटुंब निर्माण करण्याचा कुटुंबात राहण्याचा, जीवन समृद्ध करण्यासाठी व जीवनाचा विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार यामध्ये येतो. शिक्षण घेतल्यावर आवडीचा व्यवसाय करण्यासाठी व त्यासाठी मुक्त संचार करण्याचा तसेच स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार म्हणजे मानव अधिकार होय असेही, त्या म्हणाल्या. यावेळी अॅड प्रा.आपासाहेब ठोसर म्हणाले, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बहुतेक नागरिकांना या विषयाचे ज्ञान नसल्याने ते वंचित राहतात. कायदा म्हणजे सागर आहे. कशासाठी व कोणासाठी जगायचे याचे तत्वज्ञान मानव अधिकारामध्ये आहे. सर्वांचे संरक्षण करण्यासाठी घटना आहे. मानव अधिकारांचे संरक्षण व्हावे असेही ते यावेळी म्हणाले. मानवी हक्क दिनानिमित्त अलका जोशी यांनीही माहिती दिली. मानवी मूल्यांना बाधा न पोहचता प्रत्येक माणसाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य हि घटनेने दिले आहे. आजच्या युवा पिढीने मानवी हक्क व कर्त्यव्याची जाणीव परिसरातील नागरिक व मित्र परिवारांना करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असेही यावेळी अलका जोशी यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचनही करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी यांनी केले.

...Read More

V. S. News
कॉंग्रेसच्या हल्‍लाबोल मोर्चासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 380 कार्यकर्ते नागपूरला रवाना

व्हीएस न्यूज - राज्यातील शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत केलेली कपात रद्द झाली पाहिजे, शेतक-यांना वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, प्रस्तावित कामगार कायद्यातील जाचक तरतुदी मागे घ्याव्यात या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्‍वाखाली 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे हल्‍लाबोल मोर्चा होणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्‍हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्‍वाखाली शहरातून 380 कार्यकर्ते नागपूरला रविवारी सायंकाळी रवाना झाले. यामध्ये सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम अगरवाल, सरचिटणीस दिलीप पांढारकर, अशोक पांढारकर, अक्षय शिंदे, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, राजन नायर, तानाजी काटे, मनोज बिशप, गौतम आरकडे, भाऊसाहेब मुकुटमल, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. नंदकुमार दुगड, जयप्रकाश बोराटे, सतिश भोसले, सुनिल राऊत, संकेत बो-हाडे, विश्वनाथ खंडाळे, परशूराम गुंजाळ, दत्तात्रय दातीर पाटील, बाबा बनसोडे, हिरा जाधव, शशीकिरण कांबळे, विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी, संदेश नवले, आबा खराडे, उबेंद्र मेनन, वासूदेव तैमल, राजन नायर, मल्लिका मेनन, मनिषा थॉमस, वत्सला नायर, एंजल नायर, मकर यादव आदींसह शहर कॉंग्रेस पदाधिकारी व महिला, युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

...Read More

V. S. News
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अंध अनाथांना मदत

व्हीएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्‍हा काँग्रेस व मावळ लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्‍हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मावळ लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, महिला काँग्रेस शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल कसबे, विनीता तिवारी, हिरा जाधव, गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, अभय तिवारी, नितेश जाधव, विराज साठे आदी उपस्थित होते. सचिन साठे व अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सचिन साठे यांच्या हस्ते कल्‍याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे यांना पाच हजारांचा धनादेष देण्यात आला. पांडूरंग खरसडे, आकाश शिंदे व नितीन भोईटे या अंध बांधवांनी सुश्राव्य गीताव्दारे सोनिया गांधींना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्‍छा दिल्‍या. समाजप्रबोधनकार शारदा मुंडे यांनी आई व बाप या विषयी प्रबोधन केले. स्वागत नरेंद्र बनसोडे, सुत्रसंचालन मयुर जयस्वाल, आभार विरेंद्र जाधव यांनी मानले.

...Read More

V. S. News
संवादातूनच सुदृढ समाजनिर्मिती शक्य - विश्वास नांगरे-पाटील

महाराष्ट्र राज्‍य डेन्टल असोसिएशनच्या राज्‍य परिषदेचे चिंचवडमध्ये शानदार उद्‌घाटन

व्हीएस न्यूज - - विद्‌वत्ता आणि विव्दानाची कधी तुलना होऊ शकत नाही. सर्वांनी नेहमी आपले कौशल्‍य एकमेकांशी संवाद साधत अद्ययावत ठेवावे. डॉक्‍टर आणि समाजातील सर्व घटकांचा संवाद असला पाहिजे. या संवादातून निर्माण होणारी ऊर्जा समाज हितासाठी खर्च झाली तर त्‍याचे चांगले परिणाम दिसून येतील. यातूनच निरामय, सुदृढ समाजनिर्मिती निर्माण होईल. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे खूप महत्‍वाचे आहे. वैद्यकीय व्यवसायात काम करणे म्हणजे समाजसेवेची चांगली संधी आहे. वैद्यकीय पेशा हे 'नोबेल प्रोफेशन' आहे, असे मत कोल्‍हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्‍य डेन्टल असोसिएशनच्या 56 व्या राज्‍य परिषदेचे उद्‌घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित विंचेकर, इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्‍येष्ठ सल्‍लागार डॉक्‍टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्‍णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना नांगरे पाटील म्‍हणाले की, वैज्ञानिक प्रगतीमुळे मोठ्याप्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहे. त्‍याचा प्रभाव वाढला आहे. मात्र या माध्यमांचा चुकीच्या पध्दतीने वापर होता कामा नये. तुम्‍ही स्विकारलेल्‍या वैद्यकीय पेशातून समाजाला काही तरी चांगले देऊ शकता. चांगल्‍या समाजनिर्मितीस तो एक हातभार लागेल.

दिवस-रात्र काम करावे लागत असल्‍याने पोलीसांवर कामाचा फार ताण आहे. पोलीस आणि डॉक्‍टर यांच्यावर हल्‍ला होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. परंतु, आपण संघटीतपणे काम केल्‍यास अशा घटनांना लगाम घालू शकतो. स्वतःच्या शक्‍तीबद्दल माहिती, विश्वास नसेल तर विजय आणि पराभव यांचा सामना करावा लागेल. परंतु, शांततेच्या काळातच अधिक घाम गाळला तर युध्दाच्या काळात कमी रक्‍त सांडते. कधी मोठे व्हावे, कधी छोटे व्हावे तसेच कधी मृदू तर कधी कठोर व्हावे हे आपल्‍याला कळले पाहिजे. आपल्‍या स्वभावात व्देष, तिरस्कार, असुया नसावी. गुण व अवगुणांसह एखाद्याला स्वीकारणे म्हणजेच प्रेम होय, असेही नांगरे पाटील म्‍हणाले.

दरम्‍यान उद्‌घाटनप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांगरे पाटील तसेच अन्य उपस्थितांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्‍या स्वागतपर भाषणात डॉ. राकेश प्रसाद यांनी तीन दिवसांच्या परिषदेमध्ये होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. देशभरातून 4300 दंत वैद्य आणि विद्यार्थी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे. ॲटोक्‍लस्टर, सायन्स पार्क येथील सहा हॉलमध्ये एकुण 118 चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो विद्यार्थी आपले पीएचडीचे प्रबंध सादर करणार आहेत. याबरोबरच दंत वैद्यकशास्‍त्रातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे देश-विदेशातील कंपन्यांचे स्‍टॉल कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले आहेत.

डॉ. अशोक ढोबळे आपल्‍या भाषणात म्हणाले की आयडीएची प्रगती फार जोमाने होत आहे. 56 व्या राज्‍यस्तरीय परिषदेसाठी पिंपरी चिंचवड शाखेने खूप कष्ट घेतले असून त्‍याचे फलस्वरूप म्‍हणजेच डॉक्‍टर, विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात मौखिक कर्करोगामुळे मृत्‍यू पावणा-यांची संख्या अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी इंडियन डेन्टल असोसिएशनने मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. तसेच फॉरेन्सिक ओरोलॉजीवर आयडीए काम करत आहे. यामध्ये पोलीस दलाची मदत घेण्यात येईल, असे डॉ. ढोबळे यांनी सांगितले.

डॉ. विश्वास पुराणिक यांनी पिंपरी चिंचवड शाखा ज्‍येष्ठ दंत वैद्य डॉ. माऊली फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्‍कृष्ट काम करत असल्‍याबद्दल कौतुक केले. गेल्‍या काही काळापासून डॉक्‍टरांवर होणा-या हल्‍ल्‍यांमध्ये वाढ झाली आहे. अशा वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी संघटन होण्याची आवश्यकता असल्‍याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघटन झाल्‍यास अशा घटनांना लगाम बसेल, असेही डॉ. पुराणिक म्‍हणाले.

डेन्टिस्टला आता सुवर्णकाळ आला आहे. पूर्वी दाताचे डॉक्‍टर असतात, अशी माहितीच लोकांना फारशी नव्हती. परंतु, आता काळ बदला असून चांगला डेन्टिस्ट कोण आहे, याचा शोध रुग्ण घेतात. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. सकारात्मक दृष्टीने काम केल्‍यास त्‍याचे फळ आपल्‍याला निश्चित मिळते. मला राजकारणाची आवड असल्‍यामुळेच मी दोन वेळा आमदार होऊ शकलो, असे आमदार डॉ. सुजित विंचेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्ही.व्ही.एस. वर्गीस, मनिषा यांनी केले. तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.

26/11 हल्‍ल्‍याची होती पूर्व कल्‍पना...

मुंबईवर झालेल्‍या 26/11 च्या हल्‍ल्‍याची पूर्व कल्‍पना दीड-दोन महिने आधिच मिळाली होती. त्‍यावेळी मी आधिच हॉटेल ताजची रेकी केलेली असल्‍याने अतिरेक्‍यांच्या पाठोपाठ म्‍हणजे 11 मिनिटात घटनास्थळी पोचलो होतो. 23 व्या मिनिटाला अतिरेक्‍याला टिपले. अतिरेकी कोठे जाऊ शकतात, कोणत्‍या ठिकाणी आपण त्‍यांची कोंडी करू शकतो याची कल्‍पना मला असल्‍यानेच अतिरेक्‍यांच्या गोळीबाराला प्रतित्तोर देवून सुखरूप बचावलो. पुणेकर नागरिकांनी रेव्ह पार्टी कारवाईबाबत मला खूप सहकार्य केले. अमंली पदार्थांच्या व्यापारातून युवकांना टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियाचे ॲडिक्‍शन आणि युवकांना पडलेला अमंली पदार्थांचा विळखा ही चिंतेची बाब असल्‍याचे विश्वास नांगरे पाटील म्‍हणाले.

...Read More

V. S. News
पोलीसांच्या मध्यस्थीने रूपीनगरमधील रिक्षा थांबा सुरू

व्हीएस न्यूज - रिक्षा थांबा सुरू ठेवण्यास काही संघटनांनी विरोध केल्यामुळे रूपीनगर येथील रिक्षा चालक व संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद पोलीसांनी मध्यस्थी करून रिक्षा थांबा सुरू केला आहे. तसेच इतर संघटनांनी रिक्षा चालकांना त्रास न देण्याची तंबीही पोलीसांनी दिली आहे. रूपीनगर येथिल रिक्षा चालकांना रिक्षा थांब्यावर व्यवसाय करण्यास काही संघटनांनी विरोध केला होता. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्या भेट घेत. रिक्षा चालकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. निगडी पोलीसांनी तात्काळ लक्ष घालत रूपीनगर येथील रिक्षा थांबा सुरू केला आहे. यावेळी धर्मराज जगताप, जॅकब मॅंथिव, नारायण लोखंडे, पंडित अँथनी, हाफिज मुल्ला, हुजूर शेख, ज्ञानेश्वर जगताप, इम्रान शेख, फिरोज शेख, आकाश काळभोर, सिकंदर शेख, विक्की जाधव, कलेश्वर सरवदे, सहरफुद्दीन सय्यद, सोहेल अत्तर आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
तरुणावर खुनी हल्ल्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक

व्हीएस न्यूज - पुर्ववैमन्यसातुन तरुणावर प्राणघातक हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी बुधवारी आणखी पाच जणांना अटक केली. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात चार जणांना अटक केली होती.

मयुर कालिदास चव्हाण (वय25), आशिस संजय लोखंडे (वय20), गुड्‌ड्या उर्फ महेश दिलीप मोरे (वय19) निखिल दिपक एडलेल्लु (वय19) व विशाल प्रकाश वाघमारे (वय 18सर्व रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात रविवारी आशिष उर्फ मट्टा मुकेश मायकल (वय23), अभिजित प्रकाश कांबळे (वय28), सनी संतोष ओव्हाळ (वय19) व प्रसाद प्रकाश डंबाळे(वय19)यांना अटक केली होती. आतापर्यत एकुण नऊ आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींना खडकी न्यायालयाने गुरूवारपर्यत पोलिस कोठडी सुनावली होती. या चार आरोपीसह बुधवारी अटक केलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी गुरूवारी न्यायालयात हजर केले असता चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावित त्यांची येरवडा काराग्रुहात रवानगी करण्यात आली. तर पाच आरोपींना दि. 10 पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी मनोज शेळके व सर्व आरोपी हे बोपोडी सर्व्हे नंबर 25 व 26 येथे रहायला आहेत. शेळके व आरोपींमध्ये पुर्वीची भांडणे होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. रविवारी रात्री 9 वाजता शेळके सांगवी येथिल एका मित्राला भेटुन घरी जात असताना बोपोडी येथिल जय मात्रुभुमि चौकात अडवुन प्रथम शिवीगाळ केली. आरोपी चव्हाण व डंबाळे यांनी शेळके यांना सिंमेटच्या गटुटुने मारहाण केली. नंतर मायकलने जख्मी शेळकेस दुचाकीवर बसवुन पिंपरी येथिल स्मशानभुमित नेले तेथे चव्हाण याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तर लोखंडे याने बिअरच्या बाटलीने मारहाण केली. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शेळके गंभीर जख्मी झाला. शेळकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस उपनिरिक्षक मदन कांबळे अधिक तपास करित आहेत.

...Read More

V. S. News
पवनाथडी जत्रेतील स्टॉल्ससाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित करणार असलेल्या पवनाथडी जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीस वाढ मिळावी अशी सूचना उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली आहे. शुक्रवारी उपमहापौरांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले असून त्यात ही सूचना केली आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे पवनाथडी जत्रा दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षी ही जत्रा 4 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 8 डिसेंबर पर्यंत होती. परंतु शहरातील बऱ्याच बचतगटांचे अर्ज भरणे राहून गेल्यामुळे ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी सूचना उपमहापौरांनी केली आहे.

...Read More

V. S. News
सहाय्यक आयुक्त डोईफोडेंना परत शासनसेवेत पाठविण्याची मागणी

व्हीएस न्यूज - प्रतिनियुक्तीवर आलेले सहा. आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचा महापालिकेतील कार्यकाल उलटून गेल्यामुळे त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात यावे अशी मागणी रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. वाघेरे यांनी गुरुवारी आयुक्तांना या बाबत निवेदन दिले आहे. वाघेरे हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत.

निवेदनात वाघेरे यांनी असे म्हटले आहे की, सहा. आयुक्त डोईफोडे 5 ऑगस्ट 2014 रोजी महापालिकेमध्ये रुजू झाले होते. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल 5 ऑगस्ट 2017 रोजीच संपला आहे. तरीही त्यांना अद्याप शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात आलेले नाही. ते आपल्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध प्रस्थापित होऊ शकतात तरी त्यांना शासनाकडे परत पाठवावे. या निवेदनाच्या प्रती महापौर, सभागृह नेता, विरोधीपक्ष नेता यांना देण्यात आल्या आहेत.

...Read More

V. S. News
कायदा सांगणारेच नियम मोडतात तेव्हा...

व्हीएस न्यूज - रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीसांनी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील मुख्य चौकात, महामार्गालगत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलकच अवैध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या मार्गावर वाहतूक पोलीसांच्या वतीने अवैध फलक लावण्यात आल्याची तक्रार महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर शनिवारी केली आहे. याबाबत ऍड. चरण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीसांनी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. या जनजागृतीचे फलक शहराच्या मुख्य चौकात दर्शनी भागात लावण्यात आले आहे. हे फलक अवैध आहे. त्यामुळे कायदा सांगणारेच जर कायदा मोडू लागल्यानंतर कायदा, नियम सर्वसामान्य नागरिक तरी कसे पाळतील? असा सवालही ऍड. चरण यांनी उपस्थित केला आहे. तसेच शहराच्या विविध भागात लावलेले अनधिकृत जाहिरात फलकांवरही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी ऍड. चरण यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
तीन वर्षाच्या चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; नराधम गजाआड

व्हीएस न्यूज - खेळायला म्हणून घेऊन गेलेल्या एका 18 वर्षाच्या तरुणाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. निगडी पोलीसांनी नराधमाला अटक केली आहे.

शिवप्रसाद यादव (वय-18 रा. चिखली, मुळ गाव उत्त्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी उत्तरप्रदेश मधील एका गावातील रहिवाशी आहेत. मुलीच्या वडिलांनीच आरोपीला पुण्यात कामासाठी आणले होते. आरोपी भंगार गोळा करायचे काम करत असून मुलीच्या घरा शेजारीच रहायला आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडित चिमुकलीला घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रकार चिमुकलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिमुकलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!