Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
निवडणुकीच्या तोंडावर पत्रकबाजी करण्यात खासदार आढळराव पटाईत – राहुल जाधव

व्हीएस न्यूज - बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या १३ वर्षांपासून खासदार असणा-या शिवाजीराव आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जवळ आली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रक काढण्यात पटाईत असलेले आढळराव यांनी पत्रकबाजी करण्यास सुरुवात केली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत ते गंभीर नसून केवळ भावनिक मुद्दा करुन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा, हल्लाबोल भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी करावयाच्या कायद्यातील बदलाला केंद्र सरकारने लेखी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन नगरसेवक राहुल जाधव यांनी खासदार आढळराव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार शिवाजीराव आढळराव हे गेल्या १३ वर्षांपासून खासदार आहेत. प्रत्येकवेळी निवडणुक आली की आढळराव बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हाती घेतात. सरकारवर आरोप करतात आणि आपण किती बैलगाडा मालकांच्या बाजुने आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

शेतक-यांमध्ये जातात मी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न करत असल्याचे खोटे सांगतात आणि नागरिकांना भुलवतात. २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणुक त्यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्यांवरुनच लढवून जिंकली. मात्र, शर्यतीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे बैलगाडा मालक-चालक संघटना त्यांच्याविरोधात गेल्या आहेत. केवळ निवडणूक जवळ आली की त्यांना बैलगाडा शर्यतीची आठवण होते, असेही जाधव म्हणाले.

आमदार महेश लांडगे यांनी तीन वर्षात राज्य सरकारच्या पाठीमागे लागून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार करुन घेतला. विशेष म्हणजे, भाजप सरकारमधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठींबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखर्चातून वकीलांची नेमणूक केली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार मोठे प्रयत्न करत आहे.

राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला की शिवसेना सत्तेत आहे. आमचे देखील तो कायदा करण्यात योगदान आहे, असे सांगून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार शिवाजीराव आढळराव करतात. या कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिली की हेच खासदार सरड्याला लाजवेल अशा प्रकारे रंग बदलतात आणि सरकारवर टीका करतात. सरकारने कायदा सक्षम केला नसल्याचे सांगतात. कायदा करताना शिवसेनेचे योगदान असे सांगतात. मग,कायदा करताना शिवसेनेचे मंत्री, आमदार काय करत होते? असा सवालही नगरसेवक जाधव यांनी उपस्थित केला आहे.

...Read More

V. S. News
महापालिकेच्या शाळेचे राष्ट्रवादीने केले उद्घाटन

व्हीएस न्यूज - पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मुले व मुली प्राथमिक विद्यालय व कै. सौ.मिनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार होते. या शाळेचे नूतनीकरनाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात झाले होते. या प्रभागातील नगरसेवक रोहित आप्पा काटे,स्वाती उर्फ माई काटे व राजू बनसोडे यांना विश्वासात घेतले नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळेच या इमारतीचे उद्घाटन आज राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक रोहित आप्पा काटे, माई काटे, निकिता कदम, सुलक्षणा धर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश संघटक विशाल काळभोर व कविता खराडे उपस्थित होते.

...Read More

V. S. News
शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरून घ्यावा - नगरसेवक नाना काटे

व्हीएस न्यूज - शास्तीकराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मूळ मालमत्ता कर भरून घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अशा बांधकामांना महापालिकेच्या वतीने थकीत मिळकतकरासोबत शास्तीकर भरण्याच्याही नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मिळकतीवर अवाच्या सव्वा शास्तीकर लादला जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शास्तीकर आणि विविध नोटीस फी यामुळे कराच्या एकूण रकमेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.

एवढी रक्कम भरण्यास नागरिकांकडून असमर्थता दर्शविली जात आहे. परंतु महापालिकेकडून नागरिकांकडे सगळ्या रकमेची सक्ती केली जात आहे. ज्या नागरिकांनी शास्तीकर आणि मिळकत कर भरण्याची असमर्थता दर्शविली आहे अशा नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देखील पाठविल्या आहेत. शास्तीकराचा ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत महापालिकेने शास्तीकर वगळून इतर कर भरून घ्यावे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि आलेल्या करातून महापालिकेच्या उत्पनात वाढ होईल. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना शास्तीकरामध्ये दिलासा द्यावा. शास्तीकर भरल्याशिवाय इतर कराचा भरणा होणार नाही, असे सॉफ्टवेअर महापालिकेने तयार केले आहे. नागरिकांची शास्तीकर भरण्याची तयारी नसल्यामुळे मूळ मिळकतकर जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीचे उत्त्पन्न वाढवायचे असेल, तर शास्तीकर सोडून इतर कर भरून घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
तीन वर्षाची चिमुकली आईच्या कुशीत विसावली

व्हिएस न्यूज - मुंबईहून पिंपरी-चिंचवडला आपल्या भावाकडे आलेल्या बहिणीची मुलगी काळेवाडी फाटा येथेच विसरली. घाबरलेली मुलगी पाहून मार्शल कंपनीत काम करणारे आनंद मोहोळ यांनी तिची विचारपुस केली. मात्र, तिला काही सांगता येत नसल्याचे त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले. चिमुकलीला पोलीसामांर्फत तिच्या आई-वडीलांकडे सुर्पूत केले.

14 जानेवारी रोजी स्वरांजली आपल्या आई समवेत काळेवाडी येथे आली होती. ती आई सोबत असताना अचानक काळेवाडी येथील बस थांबा येथून गायब झाली. तेथून जाणारे आनंद मोहोळ यांना घाबरलेली स्वरांजली निदर्शनास आली. त्यांनी स्थानिक नगरसेवक, वाकड पोलीस यांनी चिमुकलीच्या आई-वडीलांचा शोध घेवून त्यांची मुलगी त्यांना सुखरूप परत केली. याबद्दल मोहोळ यांचा वाकड पोलीस व सिमन्ड मार्शल कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
...Read More

V. S. News
लोणावळा शिवसेना महिला गटनेत्याला खंडणीसाठी धमकी

व्हिएस न्यूज -शिवसेना पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून तिघांनी भरस्त्यात पाच लाखांची खंडणी देण्यासाठी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी हुडको कॉलनी येथील अनाथ आश्रमात मुलांना नाष्टा घेऊन जात होत्या. गाडीसमोर दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी गाडी अडवत आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत धमकावले असल्याचे सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी तात्काळ लोणावळा पोलीस ठाणे गाठत या प्रकाराची तक्रार दिली. दरम्यान, एका महिला नगरसेविका भर रस्त्यात अडवून खंडणीची मागणी केल्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर खंडणी मागणाऱ्या आरोपींनी त्वरीत अटक करण्याची मागणी शहर शिवसेनेने पोलीसांकडे केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट हे तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
निगडी-दापोडी बीआरटीएसच्या नव्या बस थाब्यांचे सामान चोरीला

व्हिएस न्यूज - गडी-दापोडी बीआरटीएस मार्ग सुरू होण्यास काही कालावधी असतानाच या बस थाब्यांचे लाखो रूपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.
निगडी ते दापोडी या मार्गावर एकूण 36 नवे बसस्टॉप बसवण्यात येत आहेत. चिंचवड ते नाशिक फाटा, फुगेवाडी याभागातील बसस्टॉपचे सामान चोरीला गेले आहे. यामध्ये बस स्टॉपवरील लाईट, स्वयंचलित दरवाजे, लोखंडी गज, दिशादर्शक फलक, विजेच्या केबल, पीव्हीसी पाईप, एसीपी शीट असे एकूण अडीच ते तीन लाखांचे सामान चोरीला गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या बस स्टॉपवर पीएमपीएमएलचे सुरक्षा रक्षक असतात मात्र त्यांना धमकावून ही चोरी होत आहे. पीएमपीएमएल प्रशासनानाने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानंतरही चोऱ्या थांबलेल्या नाहीत, अशी माहिती बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजणे यांनी दिली.
महापौरांची पोलीस उपायुक्तांकडे तक्रार ....
बीआरटीएस बस थाब्यांचे साहित्य चोरीला जात असल्याबाबत महापौर नितीन काळजे यांनी नुकतीच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन दिले होते. सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असल्याने त्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापौरांनी केली आहे. परंतू, पोलीसांनी अद्याप यावर काहीच कारवाई केली नसून दिवसेंदिवस साहित्य चोरीच्या घटना वाढत आहेत.
...Read More

V. S. News
ईडीच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीर गृहप्रकल्प बांधून फ्लॅट विकले

व्हिएस न्यूज - केंद्राच्या सक्त वसुली विभागाने (ई.डी.) 2013 मध्ये जप्त केलेल्या जमिनीची सरकारी बाबूंनी दोनवेळा नोंदणी करून बेकायदेशीररित्या विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट बांधून विकल्याचेही समोर आले आहे. हा व्यवहार करणाऱ्या मुळशी व पौड येथील दोन दुय्यम निबंधक, बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सक्त वसुली विभागाचे अधिकारी धनशिलन दामोदरन नायर (वय-45, रा. डोंबिवली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद मोहम्मद मसुद, साजीद इब्राहिम वारेकर, गुड्डू शेख, प्रवीण रामचंद्र गुरव, साहिल रिऍल्टर्स, हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा. लि., दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी-2, दुय्यम निबंधक कार्यालय पौड यांच्यावर फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्त वसुली विभागाने (ईडी) 15 जुलै 2013 मध्ये सर्व्हे नंबर 220 हिस्सा क्रमांक 1 व 5/5 ता. मुळशी येथे 83 आर ही मिळकत जप्त केली. हे माहिती असूनसुद्धा सय्यद मसूद याने ती जमीन साजिद इब्राहिम वारेकर, गुड्डू शेख, प्रवीण रामचंद्र गुरव, साहिल रिऍल्टर्स, हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा.लि. यांना विकली. यासाठी दुय्यम निबंधकाशी संगनमत केले. दोनवेळा या जमिनीची निबंधक कार्यालयाच्या रजिस्टरवर नोंद केली. ही जमीन सक्त वसुली विभागाची असल्याची माहिती असून सुद्धा हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा.लि. चे संचालक प्रवीण गुरव यांनी तेथे उत्कर्ष हा गृहप्रकल्प बांधला. या प्रकल्पातील फ्लॅट हिंजवडी येथे सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्यानी विकत घेतले आहे. त्यामुळे या अभियंत्याचीही फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा तपास चतुःश्रृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विक्रम पाटील करीत आहेत.
...Read More

V. S. News
जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करा - दाखले

व्हीएस न्यूज - जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शनकंपनीकडून गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेञात अंडरग्राऊड केबल टाकन्याचे खोदाईचे काम करीत आहे. जे.के.यु रोडचीखोदाई करण्यात येत असून खोदाईचे काम करीत आसताना कुठल्याही प्रकारची सुरक्षातेची काळजी घेतली नाही. त्यामुळे, सदरील रोडवर मोठ- मोठे खड्डेपडले आहेत.

परिणामी त्या ठिकाणी रोज छोटे मोठे अपघात घडतअसून शालेय लहान मुलांचे पाय मुरगळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचप्रमाणे, पिंपरीमधील आदर्शनगर मोनिका अपार्टमेंट समोरील बाजू गेल्या चार ते पाच दिवसांपासून चारचाकी गाड्या फसण्याचेअडकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सदरीलठिकाणी काम करणाऱ्या कंपनी सुपरवायजरला तक्रार केली असता आमदाराच्या नातेवाईकाचे कॉन्ट्रक्टअसल्याचे सांगितले जाते. यामुळे लोक घाबरून दाद देखील मागत नाही, तरी याबाबत गंभीर दखल घेवून कारवाई करण्यात यावी, असेही दाखल यांनी निवेदनात नमूद केले आहे.

...Read More

V. S. News
घरकूलमध्ये पोलीस चौकी उभारण्याची मागणी

व्हीएस न्यूज - येथील घरकुल प्रकल्प व परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडत आहेत. या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुमार पळसुले यांच्या समवेत या भागाची पाहणी केली.

 पोलीस उपायुक्त शिंदे व पोलीस अधिकाऱ्यांपुढे परिसरातील नागरिकांनी समस्या मांडल्या. तसेच, गुन्हेगारीला आवर घालण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान, घरकुल व परिसरात लवकरात लवकर पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी एकनाथ पवार यांनी मागणी केली. त्याबाबत लवकरच पोलिस चौकी उभारण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले आहे.

...Read More

V. S. News
पिंपळेगुरवमध्ये चार दुचाकी जाळल्या

व्हीएस न्यूज - अज्ञात आरोपींंनी इमारतीच्या पार्कींगमध्ये पार्क केलेल्या एकाच घरातील चार दुचाकी जाळल्या. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास जवळकरनगर येथे घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालोमी डेव्हीड (वय-22. रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास अज्ञातांनी डेव्हीड यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या चार दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. मात्र दुचाकी जाळण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सांगवी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दुचाकी तोडफोडीनंतर आता दुचाकी जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीय झाले आहेत.

...Read More

V. S. News
पत्नीने आईच्या मदतीने केले पतीवर ब्लेडने वार

पत्नी पोलीसांच्या ताब्यात, सासू फरार

व्हीएस न्यूज - पत्नीने तिच्या आईच्या मदतीने पतीवर हेक्सा ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पत्नीला भोसरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून तिची आई फरार आहे.
नारायण मोहन तावरे (वय-30 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी झालेल्या पतीने नाव आहे. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी आरती नारायण तावरे (वय-26 रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची आई सुमन हरिदास बोबडे फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावरे व त्याची पत्नी आरती गेल्या काही महिन्यापुर्वी विभक्त झाले आहेत. त्यामुळे मुलांसह तिची आई सुमन हिच्याकडे बालाजीनगर झोपडपट्टीत रहात होती. नारायण मंगळवारी सकाळी त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी बालाजीनगर येथे आला. त्यावेळी त्याच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. यावरून चिडलेल्या पत्नीने व तिच्या आईने तावरे यांना धरले. तर आरतीने हेक्सा ब्लेडने तावरे यांच्या यांच्या छातीवर गंभीर वार केले. दरम्यान, तावरे यांच्यावर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!