व्हिएसन्यूज - मुंबईहून पिंपरी-चिंचवडला आपल्या भावाकडे आलेल्या बहिणीची मुलगी काळेवाडी फाटा येथेच विसरली. घाबरलेली मुलगी पाहून मार्शल कंपनीत काम करणारे आनंद मोहोळ यांनी तिची विचारपुस केली. मात्र, तिला काही सांगता येत नसल्याचे त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठले. चिमुकलीला पोलीसामांर्फत तिच्या आई-वडीलांकडे सुर्पूत केले.
14 जानेवारी रोजी स्वरांजली आपल्या आई समवेत काळेवाडी येथे आली होती. ती आई सोबत असताना अचानक काळेवाडी येथील बस थांबा येथून गायब झाली. तेथून जाणारे आनंद मोहोळ यांना घाबरलेली स्वरांजली निदर्शनास आली. त्यांनी स्थानिक नगरसेवक, वाकड पोलीस यांनी चिमुकलीच्या आई-वडीलांचा शोध घेवून त्यांची मुलगी त्यांना सुखरूप परत केली. याबद्दल मोहोळ यांचा वाकड पोलीस व सिमन्ड मार्शल कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.