निगडी-दापोडी बीआरटीएसच्या नव्या बस थाब्यांचे सामान चोरीला
निगडी-दापोडी
2018-01-17
व्हिएसन्यूज - गडी-दापोडी बीआरटीएस मार्ग सुरू होण्यास काही कालावधी असतानाच या बस थाब्यांचे लाखो रूपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.
निगडी ते दापोडी या मार्गावर एकूण 36 नवे बसस्टॉप बसवण्यात येत आहेत. चिंचवड ते नाशिक फाटा, फुगेवाडी याभागातील बसस्टॉपचे सामान चोरीला गेले आहे. यामध्ये बस स्टॉपवरील लाईट, स्वयंचलित दरवाजे, लोखंडी गज, दिशादर्शक फलक, विजेच्या केबल, पीव्हीसी पाईप, एसीपी शीट असे एकूण अडीच ते तीन लाखांचे सामान चोरीला गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या बस स्टॉपवर पीएमपीएमएलचे सुरक्षा रक्षक असतात मात्र त्यांना धमकावून ही चोरी होत आहे. पीएमपीएमएल प्रशासनानाने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यानंतरही चोऱ्या थांबलेल्या नाहीत, अशी माहिती बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजणे यांनी दिली.
महापौरांची पोलीस उपायुक्तांकडे तक्रार ....
बीआरटीएस बस थाब्यांचे साहित्य चोरीला जात असल्याबाबत महापौर नितीन काळजे यांनी नुकतीच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन दिले होते. सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असल्याने त्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापौरांनी केली आहे. परंतू, पोलीसांनी अद्याप यावर काहीच कारवाई केली नसून दिवसेंदिवस साहित्य चोरीच्या घटना वाढत आहेत.