व्हीएस न्यूज - अज्ञात आरोपींंनी इमारतीच्या पार्कींगमध्ये पार्क केलेल्या एकाच घरातील चार दुचाकी जाळल्या. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास जवळकरनगर येथे घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालोमी डेव्हीड (वय-22. रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास अज्ञातांनी डेव्हीड यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या चार दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. मात्र दुचाकी जाळण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सांगवी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दुचाकी तोडफोडीनंतर आता दुचाकी जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीय झाले आहेत.