Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
दहावीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

व्हीएस न्यूज - दहावीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी, रामनगर येथे उघडकीस आली. मिलिंद सुशील कांबळे (वय 16, रा. रामनगर, रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद हा नापास झाल्याने त्याने नववीमध्ये शाळा सोडली होती. मात्र त्याच्या वडीलांनी त्याचा दहावीच्या परीक्षेचा सतरा नंबर फॉर्म भरला होता. मात्र त्याला अभ्यासात रस नव्हता. याच तणावातून त्याने घरात कोणी नसताना गळफास घेतला. संध्याकाळी त्याची आई घरी आली असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

व्हीएस न्यूज - पिंपरी महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोघांनी एका महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला आहे.

संकेत चंद्रकांत मुंदडा (वय-25, रा. धर्मा अपार्टमेंट, नव महाराष्ट्र शाळेसमोर पिंपरीगाव), दिपक नाथाजी पाटील ऊर्फ दिपक नाथाजी रयभान (वय-35, रा. पायल क्लासिक, गोंधळेनगर, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेचा पती प्रथमेश जाधव (वय-25, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जाधव यांच्या पत्नीस पिंपरी महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. नोकरीसाठी साडेतीन लाख रूपये द्यावे लागतील, असे आरोपींनी फिर्य़ादी यांच्या पत्नीस सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षख ठुबल अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पुर्व वैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याने केले तरूणावर वार


व्हीएस न्यूज - पूर्व वैमनस्यातून सात जणांच्या टोळक्यांनी कोयता व चॉपरने एका तरूणावर वार केले. ही घटना सोमवारी ही रात्री अकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गिता मंदिराजवळ घडली आहे.
दिनेश शिंगाडे असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल मारूती बनपट्टे (वय-35), कमलेश युवराज बनपट्टे (वय-24), गणेश राजू बनपट्टे (वय-26), जॉर्ज विल्याम फ्रांसिस (वय-35, रा. सर्व खराळवाडी), अविनाश राजु चौगुले (वय-22,रा. वडारवाडी, पुणे) या पाच आरोपींना पिंपरी पोलीसांनी अटक केली असून संजय बनपट्टे (वय-35), राजू बनपट्टे (वय-45) हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी गणेश विलास शिंगाडे (वय-28, रा खऱाळवाडी) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शिंगाडे व दिनेश शिंगाडे भाऊ आहेत. त्यांची आई आजारी असल्याने दिनेश तिला भेटण्यासाठी खराळवाडी येथे आला होता. पुर्वीच्या भांडणातून आरोपी विठ्ठल बनपट्टे याने दिनेश याच्या पोटावर कोयत्याने वार केले. आरोपी गणेश बनपट्टे याने चॉपरने वार केले. त्यांच्या साथीदारांनी दिनेशला हाताने जबर मारहाण केली. भांडणे सोडविण्यास आलेल्या फिर्यादी यांची काकू सुंदर शिंगाडे यांना कमलेश बनपट्टे याने मारहाण करून जखमी केले. दरम्यान, दिनेशवर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फौजदार एस. पाटील अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे तरुणांकडुन चित्रीकरण , खडकीतील प्रकार

व्हीएस न्यूज - आंघोळ करणाऱ्या दोन अल्पवयीन व एक महाविद्यालयीन मुलीचे चित्रिकरण करणाऱ्या दोन तरुणांच्या नावे खडकी पोलिस ठाणे येथे सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी राहणाऱ्या या दोन टवाळखोरांना रहिवासियांनी चांगला चोप दिला असुन पोलिसी कारवाईच्या भितीने त्यांनी पळ काढला आहे.
खडकीतील सुरती मोहल्ला येथे तिन मुली आपल्या नातेवाईकांसमवेत राहतात. यातील दोन अल्पवयीन तर एक महाविद्यालयिन मुलगी आहे. शनिवारी अल्पवयीन मुलगी आंघोळ करित असताना शेजारी राहणारे नन्या उर्फ तेजस तुपे (वय-21 रा.सुरती मोहल्ला खडकी बाजार) व एक तरुण (त्याचे नाव समजु शकले नाही) हे दोघे खिडकीतुन पाहत होते व मोबाईलवर चित्रिकरण करित होते. आंघोळ करणाऱ्या मुलीस कसला तरी आवाज आला व तिने खिडकीत पाहिले असता दोघे दिसले तिने ओरडून घरच्यांना बोलावुन घेतले व घडलेला प्रकार सांगितला.

कुटुंबियांनी दोन्ही तरुणांच्या घरी जाऊन रहिवासियांच्या मदतीने दोघांना चांगला चोप दिला. नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली रहिवासियांनी व नातेवाईकांनी चोप दिल्यानंतर पोलिस कारवाईच्या भितीने दोघांनी पळ काढला. पोलिस दोघांचा ही शोध घेत आहेत. पोलिस निरिक्षक (गुन्हे) अजित लकडे अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
तरुणांनी कौशल्य प्राप्त केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – खासदार अमर साबळे

व्हीएस न्यूज - बेरोजगार युवकांनी विविध रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.

पिंपरी प्रभागातील नगरसेवक संदीप वाघेरे व संदीप वाघेरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याचे उदघाटन राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आझम पानसरे व आयोजक नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक माऊली थोरात, माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक स्वावलंबी व उद्योजक व्हावा यासाठी कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. ही योजना सर्व देशभर राबविण्यात येत आहे. युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्यातील कौशल्याचा विकास करून रोजगाराभिमुख बनावे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आपल्या या कौशल्याला संधी उपलब्ध होते त्या संधीचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा असे आवाहनही खासदार साबळे यांनी केले.

...Read More

V. S. News
थेरगाव प्रभागात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करा - नगरसेवक सचिन भोसले

व्हीएस न्यूज - गणेशनगर, थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये मध्यम वर्गीयांची संख्या लक्षणिय आहे. येथे अनेक खाजगी शाळा असून त्यांची फी देखील प्रचंड आहे. सर्वसामान्यांना ही फी न परवडणारी आहे. त्यात महापालिकेची एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे महापालिकेने या प्रभागात त्वरीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी शिक्षणाधिकारी बी.एस.आवारे यांच्याकडे केली आहे.

भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, प्रभाग क्रमांक २४ गणेशनगर, थेरगाव येथे महापालिकेच्या दोन शाळा आहेत. तेथे मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या दोन्ही शाळेत सुमारे अकराशे विद्यार्थी आहेत. या प्रभागात मध्यम वर्गीय नागरिकांची संख्या लक्षणिय आहे. येथील नागरिकांची आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याची तीव्र इच्छा असते. परंतू खाजगी शाळाची प्रचंड असलेली फी त्यामुळे त्यांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देता येत नाही. यासर्व गोष्टींचा विचार करता नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितार्थ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अतिशय स्पर्धात्मक झाले असल्यामुळे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार असल्याचे नगरसेवक भोसले यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.

गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते वाकड येथून नगरसेवकपदी निवडून आले होते. सध्या त्यांच्याकडे महापालिकेचे गटनेतेपद आहे. कलाटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती.

योगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. बंडखोरी केल्यामुळे त्यांना पदच्युत करण्यात आले होते. माझ्यावरील अन्यायाविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असल्याचे सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी त्यांनी जुळवून घेतल्यामुळे बारणे यांनी शहरप्रमुख म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे त्यांना शहरप्रमुखपद बहाल करण्यात आले आहे.

बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.

...Read More

V. S. News
नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बुधवार दि.१७ रोजी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते होणार आहे. ९.३० वाजता बिल्डींग नं.६०/४ से.नं.२ येथे माता पिता संघ कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १० वाजता बालाजीनगर टेल्कोरोड येथे आरोग्य शिबीर, १०.१५ वाजता बालाजीनगर येथील अंगणवाडी-बालवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच १०.३० वाजता खंडेवस्ती येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, ११ वाजता इंद्रायणीनगर येथील अदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना फळवाटप, दुपारी १२ वाजता भोसरी पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळा येथे अन्नदान तसेच १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता इंद्रायणीनगर गणेशमंदीर येथे महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम इंद्रायणीनगर येथील से.नं.२ मिनी मार्केट येथे होईल. तसेच इंद्रायणीनगर येथील नगरसेवक संजय वाबळे यांचे कार्यालय येथे दि.१६ ते दि.२० जानेवारी दरम्यान मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी पुस्तकांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलीय. बहुजन हिताय सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती संजय वाबळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनी विकल्या, हफ्ते गोळा केले; सीआयडी चौकशीची मागणी

व्हीएस न्यूज पिंपळेगुरवमधील राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली आहे. त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हफ्ता गोळा केला गेला आहे. तसेच या माजी नगरसेवकाने महार वतनाच्या जमिनींचीही परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपकडून अभय मिळत असल्याचे या माजी नगरसेवकाने सांगणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील जमीन विक्रीतून नागरिकांच्या झालेली आर्थिक फसवणूक आणि महार वतनाच्या जमिनींची परस्पर विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी केली आहे.

यासंदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपळेगुरवमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे हफ्ते गोळा केले आहेत. त्यांची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनाही आपले बांधकाम करण्यासाठी हफ्ते देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असंख्य गोरगरीब नागरिकांकडून अनधिकृत बांधकामांसाठी हफ्ते या माजी नगरसेवकाने लाखोंची माया गोळा केली आहे. या माजी नगरसेवकाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या या माजी नगरसेवकाला मतदारांनी घरी बसविले.

भाजपची लाट असतानाही मतदारांनी या माजी नगरसेवकाला नाकारले. या माजी नगरसेवकाने पिंपळेगुरव आणि सांगवी भागातील पूररेषेतील अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. त्यातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नागरिकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर संबंधित जागा ही पूररेषेत असल्याचे लक्षात आले. परंतु, या माजी नगरसेवकाची प्रभागात दहशत असल्यामुळे एकाही नागरिकाने त्याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही. परंतु, निवडणुकीत पराभव करून नागरिकांनी या माजी नगरसेवकावर असलेला रोष व्यक्त केला.

या माजी नगरसेवकाने बेकायदेशीरपणे विकलेल्या पूररेषेतील जागांवरच शेकडो अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि आजही काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना आता अभय मिळत आहे. असे असताना या माजी नगरसेवकाने अनधिकृत बांधकामांवर बोलणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील बांधकामांवर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. याच महाशयाने महार वतनांच्या जमिनींची परस्पर विक्री करून मागासवर्गातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सांगवी व पिंपळेगुरवर भागातील पूररेषेतील जमिनींची विक्री, नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक तसेच महार वतनांच्या जमिनींची परस्पर झालेल्या विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

...Read More

V. S. News
परमार्थात श्रवण व सद्‌गुरुंना महत्व - प्रल्हाद वामनराव पै

व्हीएस न्यूज - परमार्थात श्रवण व सद्‌गुरु यांना फार महत्व आहे. सद्‌गुरुशिवाय गती नाही तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. कोणाकडून तरी माळ किंवा मंत्र घेतला म्हणजे आपल्याला सद्‌गुरु मिळाला असे समजू नये. वास्तविक, गुरु-शिष्य संबंध जोडण्याची ही केवळ एक सांप्रदायिक रीत आहे. इतकेच याने परमार्थ-मार्गात पहिले पाऊल टाकले एवढेच घडले. श्रवणाची वाट चोखाळली शुध्द। गेले भेदाभेद निवारोनी।। असे मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी भोसरी येथे केले. आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे, जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त शैलेश मोरे, पै. किसनराव लांडगे, पै. सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक सुखाच्या मागे धावत आहे. सुख कुठे मिळेल याचा शोध माणूस अव्याहतपणे घेत असतो. काही वेळा तो आपल्या मार्गावरुन भरकटण्याचा सुध्दा धोका असतो. परंतू जीवनविद्या मिशन समाजाला सुखाचा मार्ग दाखविण्याचे काम करीत आहे. सद्‌गुरु वामनराव पै यांचे हे कार्य प्रल्हाद पै पुढे नेत आहेत. प्रारंभी खा. बारणे, आ. महेश लांडगे यांचा मिशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर उद्योजक कार्तिक लांडगे, नितीन लांडगे, युवराज लांडगे, नितीन लांडगे, सागर लांडगे, प्रज्ञा कार्तिक लांडगे यांनी प्रल्हाद पै यांचा सत्कार केला.

या तीन दिवसीय सोहळ्यात राज्यभरातून सुमारे एक लाखांहून जास्त साधकांनी पै यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ घेतला. 450 हून जास्त व्यक्तींनी अवयव व देहदानाचे अर्ज भरले. जीवनविद्या मिशनच्या वतीने चालविण्यात येणा-या संस्कार शिक्षण अभियान, गर्भ संस्कार, विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन, कौटूंबिक सौख्य, स्वानंदयोग, जीवन जगण्याची कला, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या मार्गदर्शन शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी महेशदादा लांडगे स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि मित्र परिवार प्रयत्नशील राहिल असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

जीवनविद्या मिशन आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या वतीने तीन दिवस अवयव प्रत्यारोपण, प्रतिरोपण आणि अवयव आणि देह दानाविषयी जगजागृती करण्यात आली. अवयव दान करण्यास इच्छुक असणा-या व्यक्तींचे अर्ज भरुन घेण्यात आले. यामध्ये राजू हरिभाऊ भगत या अंध व्यक्तीसह 450 व्यक्तींनी अवयव दानाचे अर्ज भरले. अशी माहिती समन्वयक विवेक पालव यांनी दिली.

पै पुढे म्हणाले की, मनावर ताबा मिळविण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. साधनेमुळे हळूहळू माणसाच्या मानसिकेतेत बदल होतो. माणसातील कृतघ्नपणा संपून कृतज्ञपणा जागृत होतो. माणसाची आसक्तीची ओढ कमी होऊन विरक्तीकडे प्रवास सुरु होतो. एखादे कर्म करताना कुठे थांबायचे हे कळले की मनुष्य प्रगतीकडे वाटचाल करतो. कर्म करत असताना आपण दैववादी होतो. देवावर अवलंबून राहतो. परंतू देवाने मनुष्याला प्रारब्ध दिले आहे. ते कर्म करण्यासाठी, म्हणजेच कर्म करण्यासाठीच प्रारब्ध भोगताना एका बाजूने कर्म दुस-या बाजूने प्रारब्ध आणि या दोन्हीच्या माध्यमातून क्रियमान व्हावे. कर्माचे फळ मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती यावी लागते. संगत आणि संस्कार यातून अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चांगल्या संगतीने गुण तर कुसंगतीने दोष वर येतात. सध्या युवा पिढीमध्ये नैराश्यमुळे व कुसंगतीमुळे व्यसनाचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अंत:र्मन शांत असेल तर अशा परिस्थितीवर सहज मात करता येते. अंत:र्मन शांत राहण्यासाठी जीवनविद्येची प्रार्थना म्हणा, मन शांत होईल. अंत:र्मन तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल, असे पै यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
अमित बच्छाव यांचा राज्यस्तरीय ‘विश्वरत्न गौरव’ पुरस्काराने सन्मान

व्हीएस न्यूज - सामाजिक व क्रिडा सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल अमित राजेंद्र बच्छाव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील व विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय हवामान व कृषी तज्ञ शास्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे, प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळंज, सुरेश कोते, शिवाजीराव कोते, शिवाजी घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन “राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव २०१७” पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते.

काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्ये देखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करुया. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडूवृत्तीने समाजासाठी कार्य करणा-यांची गरज आहे असे मत अमित बच्छाव यांनी सत्कारानंतर व्यक्त केले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!