व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उदयमुख होतकरू कुस्ती खेळाडूंसाठी शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आपल्या आमदार निधीमधून ५ लाख रुपयांची अंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट प्रदान केली.
येथील राजा शिवछत्रपती कुस्ती प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा कार्यक्रम झाला. केंद्राचे संस्थापक राजेश उर्फ पप्पू काळभोर यांच्या संयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार गौतम चाबुकस्वार,माझी महापौर आझम पानसरे, नगरसेवक अमित गावडे, विलास यादव, अर्जुन पुरस्कार विजेते गोपाळ देवांग, ऑलम्पिकवीर मारुती आडकर, श्रीराम कोकणे, व्ही. एस. काळभोर, शंकरराव पांढरकर, धनंजय काळभोर, सचिन काळभोर, विठ्ठल काळभोर, राजेंद्र बाबर, संतोष माचुत्रे, भारत केसरी विजय गावडे, अमित बाबर, बाबा बुचडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण केंद्रात दररोज सकाळ व संध्याकाळ या वेळात या मॅटवर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख व राष्ट्रीय खेळाडू पप्पू काळभोर यांनी यावेळी दिली. तर या मॅटचा वापर शहरातील अधिकाधिक तरुणांनी घ्यावा व शहराचे नाव क्रीडास्तरावर उंचवावे असे आवाहन आमदार चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय मोरे, प्रास्ताविक पै. पप्पू काळभोर तर आभार पै. ज्ञानेश्वर कुटे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - मोतीबिंदू आजाराने पीडित असणाऱ्या ३५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचा संकल्प राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे शौर्य प्रतिष्ठाण,गैलक्सी डायनस्टिक क्लीनिक, विशाल वाळुंजकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उदघाटन शौर्य प्रतिष्ठानचे खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार साबळे यांचे औक्षण करून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक माऊली थोरात, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विजय शिनकर, ख्रिस्ती समाज विकास संघ अध्यक्ष दीपक चक्रनारायण, प्रा.मनोज वाखारे, संभाजी फुगे, RMC फाऊंडेशन अध्यक्ष रुपेश चांदेरे, सामाजिक कार्यकर्ते इमामभाई शेख, शौर्य प्रतिष्ठण सचिव नाना ढोकले, महिला अध्यक्षा जयश्री नवगिरे, भाजप युवा मोर्चा सचिव प्रथमेश पाठक,आम्ही समर्थ ग्रुप अध्यक्ष रवी क्षीरसागर, सुरज भोसले,गणेश भोकरे, निलेश निलेश सफेरा, भाजप प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, सुधीर चव्हाण, नूतन जाधव, रवी शिंदे, निलेश आरडे,विनोद जगताप, अविनाश थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
आरोग्य शिबीरामध्ये नेत्र चिकित्सा, अल्प दरात चष्मे वाटप, हाडांची ठिसुळता, मणका, सांधेदुकी, सर्व हाडांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे ५०० रुग्णांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यावेळी शिबिरात डॉ.ऋषिकेश पवार, डॉ.शीतल पवार, हॉस्पिटल व्यवस्थापक सी.के.काळे, अक्षय काटे या डॉक्टरांनी सहकार्य केले. शौर्य प्रतिष्ठाणचे कार्य समाजासाठी कौतुकस्पद आहे. समाजहितासाठी नेहमी कार्य करीत राहवे, गोरगरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत प्रत्येकाने अंमलात आणले पाहिजे, असे आवाहन खासदार साबळे यांनी केले. दरम्यान, तामीळनाडू येथे राष्ट्रीय चेस बॉक्ससिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बद्दल बॉक्सर राहुल धोत्रे याचा सत्कार खासदार साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभावती जगताप, शुभम शिवले,साहिल शेख, निलेश मंडलिक,गणेश जावीर, ओंकार जगताप यांनी काम पाहिले. कार्यक्रम सूत्रसंचालन प्रा.गोरख ब्राम्हणेसर व आभार शौर्य प्रतिष्ठण कार्यध्यक्ष विशाल सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - प्रत्येकाने आपल्या मनाशी संवाद साधूनच उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करावी. प्रत्येकांच्या मनस्थितीचा परिणाम शरीरावर होत असतो. जो मनाने संतुष्ठ असतो, तोच समोरच्यांना संतुष्ठ करु शकतो. डॉक्टरांकडून मिळणारा विश्वास आणि सकारात्मकतेमुळे रुग्ण लवकर बरे होतात. फक्त शरीराचे डॉक्टर न होता, रुग्णांच्या मनावर देखील उपचार करणारे डॉक्टर व्हावे असे मार्गदर्शन ब्रम्हाकुमारी शिवानीदिदी यांनी केले.
ब्रम्हाकुमारी मेडीकल विभागाच्या वतीने पुणे व सांगवीतील तनुश्री गर्भसंस्कार आणि सुविधा आयुर्वेद संशोधन संस्थेने जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित केलेल्या डॉक्टरांसाठी ‘मानसिक आजार औषध परिषद’(Mind Body Medicin Conference) बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन डॉ. केएच संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप काळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यासपिठावर निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानच्या भाग्यश्री पाटील, प्रतिभा मोडक, संयोजिका डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. सुभाष रानडे, डॉ.विजय डोहिफोडे, डॉ. शिरीष शेपाळ, डॉ. अनिल गुगळे, बनारसीभाई, सरितादिदी, डॉ. अरविंद संगमनेरकर आदी उपस्थित होते.
शिवानीदिदी म्हणाल्या की, जीवनात नको तिथे भावनिक गुंतवणूक केल्यास नकारात्मक परतावा मिळेल. मनापासून केलेल्या व्यवहारातून सकारात्मक परतावा मिळेल. जेंव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, व्देष नष्ट होईल. तेंव्हा आपल्या चहूबाजूला नेहमी सकारात्मक वलय निर्माण झाल्याचे दिसेल. डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात सकारात्मक विचारांव्दारे मंदीराप्रमाणे प्रसन्न वलय निर्माण करावे. येथे येणारा रुग्ण देवाप्रमाणे डॉक्टरांवर भरवसा ठेवून येईल व विश्वासाने पुर्ण बरा होऊन जाईल. रुग्णालय परिसरातील सकारात्मक ऊर्जा वलय व आदरयुक्त आदरातिथ्याने रुग्णाचे स्वागत झाल्यास 50टक्के रुग्ण आपोआप बरा होईल. आज काल डॉक्टरच खुप ताण तणावाखाली त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणा-यांना नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. डॉक्टर रुग्णांच्या नात्यात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व प्राप्त झाल्याचे दिसते. एखादा व्यवसाय, उद्योग, नोकरी निवडताना शालेय गुणवत्तेत किती गुण आहेत यावरती ठरते. परंतू त्याच वेळी तो व्यवसाय, उद्योग, नोकरी करण्याची मानसिक तयारी, त्याबाबतचे संस्कार आपल्यात आहेत का? याचा प्रत्येकांनी विचार करावा. असे मार्गदर्शन शिवानीदिदी यांनी केले. डॉ. केएस संचेती म्हणाले की, ज्या पध्दतीने संस्कृतीचा स्विकार करतो तो धर्म, मनापासून जे करतो ते अध्यात्म. मनाची निगा राखली तर ह्रदयाला देखील औषधांची गरज भासणार नाही. प्रास्ताविक डॉ. सुप्रिया गुगळे, सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ, आभार सवितादिदी व पुजा शेपाळ यांनी मानले.
व्हीएस न्यूज - विरोधी पक्षाची भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे खूप चांगल्या प्रकारे वठवतात. ते जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात राहिले आहेत, त्यांनी तेव्हा तेव्हा विरोधी पक्षाचे खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
शरद जोशींनी हमीभावासाठी १९८५-८६ साली मोठे आंदोलन उभारले होते. त्यावरुन देशभर रान पेटले होते. काँग्रेसने त्यानंतरही काही केले नाही. मग स्वामिनाथन आयोगाची स्थापना अटल बिहारी वाजपेयींनी केली. तो अहवाल पवार केंद्रीय मंत्री असताना आला. तो अहवाल त्यावेळीच मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या, असे म्हणत खासदार काकडेंनी पवारांवर निशाणा साधला. काकडे पुढे म्हणाले, स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही ८ वर्षे गेली. पण अखेर अहवालातील काही गोष्टी घेत, मोदी सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केला. मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी पवार ते लोकांची दिशाभूल करत असल्याचेही काकडे म्हणाले.
व्हीएस न्यूज - अल्प उत्पन्न गटातील महिलांना सॅनिटरी पॅडस वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सह. संस्थेच्या वतीने 'ना नफा ना तोटा' तत्वावर सॅनिटरी पॅडसची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच वापरलेले पॅडसची पर्यावरण पुरक अशी शास्त्रीयरीत्या मशीनव्दारे विल्हेवाट लावणे हा उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविण्यात येत आहे. तसेच संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व संत गाडगे बाबा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सुका कचरा द्या, पैसे घ्या ही उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी 9822940610, 98500065386 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरूण वायदंडे यांनी केले आहे....Read More
व्हीएस न्यूज - पिपंरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एसबी पाटील इंन्स्टिट्युट मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) मध्ये युवोत्सव 2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत पीसीसीओई (अ) निगडी व बास्केटबॉल स्पर्धेत आयसीसीएस ताथवडे संघाने विजय मिळविला.
या स्पर्धेत पुण्या जिल्ह्यातून फुटबॉलच्या 32 व बास्केटबॉलच्या 18 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द गिर्यारोहक अर्पणा प्रभूदेसाई व पीसीईटीचे संचालक भाईजान काझी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, संशोधन विभाग प्रमुख डॉ. हंसराज थोरात उपस्थित होते.
पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निगडीतील एसबीपीआयएम मध्ये 2015 पासून पासून आंतर महाविद्यालयीन फुटबॉल व बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ भाईजान काझी व डॉ. डॅनियल पेनकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
फुटबॉल अंतिम निकाल प्रथम क्रमांक - पीसीसीओई(अ), निगडी, व्दितीय क्रमांक - पीसीसीओई (ब), निगडी, तॄतीय क्रमांक आयसीसीएस, ताथवडे ; बास्केटबॉल अंतिम निकाल प्रथम क्रमांक - आयसीसीएस, ताथवडे, व्दितीय क्रमांक - आरएससीओई, ताथवडे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002