व्हीएस न्यूज - पिंपरी न्यायालयात ऍड. आतिश लांडगे व ऍड. प्रसन्ना लोखंडे यांची पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने रिमांड ऍडव्होटेकट म्हणून नियुक्ती केली होती. ही नियुक्ती झाल्यानंतर एकाच आठवड्यात आरोपी विठ्ठल अशोक उंबरे व चंद्रकांत गायकवाड या आरोपींना वकील मिळत नव्हता. रिमांड ऍडव्होकेटमुळे दोन आरोपींची मोफत मुक्तता करण्यात आली.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हे आरोपी जामीनाअभावी येरवडा कारागृहात बंदिस्त होते. ही बाब न्यायाधीश ए. ए. धुमकेकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर आरोपींच्या प्रकरणात ऍड. आतिश लांडगे व ऍड. प्रसन्ना लोखंडे यांच्या मागील आठवड्यात विधी सेवा प्राधिकरणामार्फत पिंपरी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. न्यायाधीश ए. ए.धुमकेकर साहेबांनी वैयक्तिक मुचलक्यावर सोडण्याचा आदेश दिला. यासाठी पिंपरी न्यायालयातील कोर्ट क्लार्क एस. के. शिंदे यांनीही पुढाकार घेतला.