व्हीएस न्यूज - अल्प उत्पन्न गटातील महिलांना सॅनिटरी पॅडस वापरण्यास प्रवृत्त करण्यासाठी संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सह. संस्थेच्या वतीने 'ना नफा ना तोटा' तत्वावर सॅनिटरी पॅडसची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच वापरलेले पॅडसची पर्यावरण पुरक अशी शास्त्रीयरीत्या मशीनव्दारे विल्हेवाट लावणे हा उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविण्यात येत आहे. तसेच संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व संत गाडगे बाबा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सुका कचरा द्या, पैसे घ्या ही उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी 9822940610, 98500065386 या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन संत गाडगे बाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरूण वायदंडे यांनी केले आहे.