शरद पवार विरोधी पक्षात राहूनच चांगले काम करु शकतात - संजय काकडे
पुणे
2018-02-07
व्हीएस न्यूज - विरोधी पक्षाची भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे खूप चांगल्या प्रकारे वठवतात. ते जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात राहिले आहेत, त्यांनी तेव्हा तेव्हा विरोधी पक्षाचे खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
शरद जोशींनी हमीभावासाठी १९८५-८६ साली मोठे आंदोलन उभारले होते. त्यावरुन देशभर रान पेटले होते. काँग्रेसने त्यानंतरही काही केले नाही. मग स्वामिनाथन आयोगाची स्थापना अटल बिहारी वाजपेयींनी केली. तो अहवाल पवार केंद्रीय मंत्री असताना आला. तो अहवाल त्यावेळीच मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या, असे म्हणत खासदार काकडेंनी पवारांवर निशाणा साधला. काकडे पुढे म्हणाले, स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही ८ वर्षे गेली. पण अखेर अहवालातील काही गोष्टी घेत, मोदी सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केला. मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी पवार ते लोकांची दिशाभूल करत असल्याचेही काकडे म्हणाले.