व्हीएस न्यूज - पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाक्षणिक उपोषणाला सुरुवात होणार आहे. हे उपोषण सायंकाळी पाचपर्यंत असणार आहे. यामध्ये ग्राहक पंचायत पिंपरी चिंचवड, सस्कार प्रतिष्ठान पुणे, आस्था सोशल फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन, ‘इ’ पिंपरी चिंचवड, प्रदीप वाल्हेकर आणि टीम, स्वातंत्र्य वीर सावरकर मंडळ, पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य, एसबीआय पेन्शनर असोसिएशन, माउली ज्येष्ठ नागरिक संघ आकुर्डी, फेडरेशन ऑफ घरकुल आणि जलदिंडी प्रतिष्ठान या संघटना लाक्षणिक उपोषणात सहभागी होणार आहेत.
पिंपरी चिचंवड सिटीझन फोरमच्या सदस्यांनी पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो निगडीपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे नागरिकांची मोठी निराशा झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असूनही या कामाच्या मंजुरीसाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘पीसीसीएफ’च्या मिस्ड कॉल मोहिमेस शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन,आयोजकांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागु करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत १८ लाख करोड जमा झालेत. करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीच्या कर माध्यमातून जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. असा सुर तज्ञ मान्यावरांनी काढला. चऱ्होली येथील डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “वस्तू व सेवा करातून भारताची प्रतिमा उंचावणे व त्या संबंधातील संधी व आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन चर्होली येथील डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठात इसरोचे माजी समूह संचालक डॉ.ए.के. संगल यांच्या हस्ते झाले. यावेळी आयकर विभागाचे सह आयुक्त हेमंत तांतीया,द.कोरियामधील जनयाँग विद्यापीठातील ब्रेन पुल शास्त्रज्ञ डॉ.डी.पी. अमळनेरकर, आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि संशोधन संस्तेचे अधिष्ठाता डॉ. सुप्तेन सर्बाधिकारी, डॉ. आनंदराय, शार्प इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टोमियो इसोगायी, महाराजा समूहाचे संचालक डॉ. सतीश शर्मा, डॉ.अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एकनाथ खेडकर आदी उपस्थित होते.
डॉ. संगल म्हणाले कि, सध्या पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आल्यास महागाई नियंत्रणात येईल. ग्रामीण भागातील नागरीकांच्या मनात जीएसटी बाबतीत भीती आहे. याबाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे. तर हि प्रणाली साधी सोपी होण्यासाठी विद्यार्थ्यानी मोबाईल ॲप्सची निर्मिती केली पाहिजे.
सह आयुक्त तांतीया म्हणाले कि, सरकारच्या तिजोरीत तब्बल १८ लाख करोड जीएसटीतून जमा झाले. यातून हजारो विकासकामे होणार आहे. जीएसटीमुळे परकीय गुंतवणुक करण्यासाठी इच्छुक आहेत. पूर्वी ३ करोड करदाते होते. सध्या एक करोड करदाते वाढले.
डॉ. खेडकर म्हणाले कि, स्वातंत्र्य काळानंतर जीएसटीमुळे ऐतिहासिक आर्थिक परिवर्तन झाले. जीएसटीमुळे नोकरीची संधी वाढली. आर्थिक सुधारणा झाली. भविष्यात नक्कीच विकास दर वाढलेला दिसेल. इसोगायी म्हणाले कि, भारत जपान ने हातात हात घालून कार्य करू. जपानी टिमवर्क आणि भारतीय जुगाड टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयातून वेगळी कलाकृतीची निर्मिती करू. मराठवाडा कॉलेजचे डॉ.श्रीराम नेर्लिकर, एलएम थापर मॅनेजमेंट स्कूलचे डॉ. रूद्रा रामेश्वर, हरियाणाचे डॉ.अमरिक सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयंका शर्मा व सार्थक शुक्ला तर आभार प्रा. इंदू मजुमदार यांनी मानले.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगीक नगरी म्हणून ओळखली जाते, औद्योगीक नगरी बरोबरच हि क्रीडा नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी महापालिकेच्या वतीने क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या लाल बहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचे तसेच अभिनव गगन स्पोर्टस क्लब यांच्या सहकार्याने माजी महापौर रंगनाथ सदाशिव फुगे महापौर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर रंगनाथ फुगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, कला,क्रिडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सभापती सागर गवळी, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, रोहित काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती काटे, सारीका बो-हाडे, स्विकृत सदस्य माऊली थोरात, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सचिन गोडबोले, अर्जुण पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा प्रशासन अधिकारी राजेश जगताप,महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, भविष्यात या शहरातून चांगल्या खेळाडूंची निर्मिती व्हावी म्हणून महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. विविध क्रिडा स्पर्धातील राज्यस्तरीय बक्षिसांचे मानकरी पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू ठरतील त्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावेत. यावेळी महापौर नितीन काळजे म्हणाले, कासारवाडी येथील लाल बाहाद्दूर शास्त्री क्रिडांगणाचा शहरातील खेळाडूंना चांगला उपयोग होणार आहे. या क्रिडांगणामध्ये खेळल्या जाणा-या विविध खेळाद्वारे शहरातून चांगले खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. विविध खेळांमध्ये जिल्हा राज्य, केंद्रासह देश विदेशातही नावलौकिक करणारे खेळाडू घडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या स्पर्धेमध्ये ८ पुरुष गट व ८ महिला संघांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये २२४ खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी माजी महापौर रंगनाथ फुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे यांनी केले तर सुत्रसंचालन जयश्री साळवी यांनी केले, आभार संजय शेंडगे यांनी मानले.
व्हीएस न्यूज - येथील आर्मी ग्राउंडवर परेड सुरु असताना एका जवानाला अचानक चक्कर आल्याने त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चक्कर आल्याची घटना शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास देहूरोड येथे घडली. चंद्रकांत चोरवाजी दाभाडगे (वय39) असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान देहूरोड येथील 787 ब्रिगेड ग्राउंडवर ए डी ब्रिगेड परेड सुरु होती. परेड अंतिम टप्प्यात असताना चंद्रकांत दाभाडगे या जवानाला अचानक चक्कर आली. मैदानात उभी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये जवानाला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात हालविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दाभाडगे यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजने प्रदूषण निर्मूलन आणि आरोग्यरक्षणाचा संदेश देण्यासाठी नुकतीच सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीत कंपनीचे कार्यकारी संचालक मलई दास, वित्तविभाग संचालक गिरीश केतकर, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. 12 किलोमीटर अंतराच्या या सायकल फेरीमध्ये 480 जणांनी भाग घेतला. त्यात महिला कर्माचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ज्या कर्मचाऱ्यांकडे सायकल नाही अशा कर्मचाऱ्यांनी हे अंतर चालून पार केले....Read More
व्हीएस न्यूज - सध्या वस्तू व सेवा कर 5 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. भविष्यात हे कर 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान निर्धारीत होतील. असे झाले तर देशांतर्गत मालाला मोठी जागतिक बाजारपेठ मिळू शकेल. परिणामी भारताची स्पर्धक क्षमता वाढून भारत जगातील विकसित देशांशी स्पर्धा करू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थ विश्लेषक डॉ. अभय टिळक यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने वस्तू व सेवा कर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थविश्लेषक डॉ. टिळक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. के.व्ही. अडसूळ, डॉ. एस.के. सानप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभय टिळक म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा करप्रणाली (जीएसटी) अत्यंत महत्त्वाची आहे. विकसित देशांनी फार पूर्वीच वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी केली आहे. 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही करप्रणाली विकसित झाली आहे. यामुळे भारतातील कोणत्याही राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूची संपूर्ण भारतात एकच किंमत असेल. औद्योगिक विकेंद्रीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. मागील 30 वर्षापासून चीनमध्ये मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे कामगार वर्ग कमी किमतीत उपलब्ध होत होता. त्यामुळे चीनी वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होता. परिणामी जागतिक बाजारपेठेत चिनी वस्तूंच्या किमती कमी होत्या. चीनची अर्थव्यवस्था उत्पादनाभिमुख होती. मात्र, आता चिनी कामगार महाग होत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत चीनचे महत्त्व कमी होत चालले आहे. भारतीय अर्थव्यवस्था मात्र सेवाभिमुख आहे. डॉ. टिळक पुढे म्हणाले, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य या संदर्भातील जबाबदाऱ्या संबंधित राज्याने पार पाडायच्या असतात. मात्र, राज्यांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागते. अशा पेचामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे मोठे आव्हान राज्यांपुढे असते. मात्र, वस्तू व सेवा करप्रणालीमुळे राज्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साहजिकच राज्यांचा विकस साधला जाणार आहे. कृष्णराव भेगडे म्हणाले, देशातील एक टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. ही आर्थिक विषमता दूर होण्यासाठी संपत्तीचे समान वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे. वरचेवर भारतातील बेरोजगारी वाढतच चालली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. हे बदलण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे, असेही भेगडे यांनी सांगितले. चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ यांनी केले. आयोजनामागील भूमिका संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा. के.व्ही. अडसूळ यांनी, तर डॉ. एस.के. सानप यांनी आभार मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - कस्पटे वस्ती, वाकड येथे सोमवारी सकाळी 10 वाजता देवर्षी नारद मंदिराचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सर्व्हे नं. 227/2/2, दुर्वांकूर पार्क, बालाजी निवासाशेजारी, हॉटेल ऍम्बियन्स मागे, कस्पटे वस्ती येथे चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक नीलकंठ चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास देवर्षी नारद विद्या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. हे मंदिर देवर्षी नारद विद्या मंडळ बांधणार आहे....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002