व्हीएस न्यूज - कस्पटे वस्ती, वाकड येथे सोमवारी सकाळी 10 वाजता देवर्षी नारद मंदिराचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सर्व्हे नं. 227/2/2, दुर्वांकूर पार्क, बालाजी निवासाशेजारी, हॉटेल ऍम्बियन्स मागे, कस्पटे वस्ती येथे चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक नीलकंठ चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास देवर्षी नारद विद्या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. हे मंदिर देवर्षी नारद विद्या मंडळ बांधणार आहे.